अतिकच्या मारेकऱ्यांना न्यायालयाने 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली…
गॅंगस्टर अतिक अहमद आणि अश्रफ यांचे मारेकरी लवलेश, सनी आणि अरुण यांना बुधवारी सकाळी प्रयागराजच्या सीजेएम न्यायालयात हजर करण्यात आले. रिमांडवर सुनावणी सुरू आहे. दरम्यान, न्यायालयाने 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी सात दिवसांची कोठडी मागितली होती. सीजेएम कोर्ट क्रमांक 10 मध्ये न्यायाधीश दिनेश कुमार गौतम यांनी कोठडीचा आदेश दिला.
दुसरीकडे न्यायालयात हजर केल्यानंतर पोलिसांनी तिघांनाही पोलिस लाईनमध्ये नेले आहे. या ठिकाणी त्यांची चौकशी होऊ शकते. यासाठी पोलिसांनी 100 प्रश्न तयार केल्याचे बोलले जात आहे. पोलिस या आरोपींच्या मोबाइलचा शोध घेत आहेत. त्यांच्याकडून शेवटच्या काळात ते कोणाच्या संपर्कात होते हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाईल.
कडकोट बंदोबस्तात कोर्टात आणले गेले
तिन्ही हल्लेखोरांना सकाळी कडेकोट बंदोबस्तात सीजेएम कोर्टात हजर करण्यात आले. त्यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली होती. तीन हल्लेखोरांना 17 एप्रिल रोजी प्रयागराज कारागृहातून प्रतापगड तुरुंगात हलवण्यात आले होते.
रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास प्रयागराजमधील कोल्विन हॉस्पिटलबाहेर तिघांनी पोलिस बंदोबस्तात गोळ्या झाडून अतिक आणि त्याचा भाऊ अशरफ यांची हत्या केली होती. यानंतर तिघांनीही सरेंडर केले होते.
नैनी जेलमधून प्रतापगड जिल्हा जेलमध्ये पाठवले होते
तीन हल्लेखोरांना आधी प्रयागराजच्या नैनी तुरुंगात ठेवण्यात आले होते, परंतु अतिकचा एक मुलगा अली हा देखील नैनी तुरुंगात आहे, त्यामुळे टोळीयुद्धाच्या भीतीने तिन्ही हल्लेखोरांना प्रतापगड जिल्हा कारागृहात हलवण्यात आले.