क्राईम

अभिनेत्री आकांक्षा दुबेची वाराणसीत आत्महत्या…

अभिनेत्री आकांक्षा दुबेने रविवारी वाराणसीतील एका हॉटेलात आत्महत्या केली. शुक्रवारी रात्री शूटिंग संपवून आकांक्षा हॉटेलमध्ये गेली. तिथे गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. ही बाब रविवारी उजेडात आली. तिने हे पाऊल का उचलले हे समजू शकले नाही.

आकांक्षाचा जन्म 21 ऑक्टोबर 1997 रोजी उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे झाला. तिला बालपणापासूनच नृत्य व अभिनयाची आवड होती. ती सोशल मीडियावर नेहमीच आपल्या डान्सचे व्हिडिओ पोस्ट करत असे. आकांक्षा भोजपुरी सीनेसृष्टीतील एक प्रसिद्ध चेहरा होती.

आकांक्षाने ‘वीरों के वीर’ व ‘कसम पैदा करने वाले की 2′ नामक चित्रपटांत काम केले होते. आज 26 मार्च रोजीच तिचे भोजपुरी सुपरस्टार पवन सिंहसोबतचे एक नवे गाणे रिलीज झाले आहे. आरा कभी हारा नहीं’ असे या गाण्याचे नाव आहे. हे गाणे न पाहताच आकांक्षाने आत्महत्या केली. यामुळे भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये दुःखाची लाट पसरली आहे.

लहानपणापासूनच होता अभिनयात रस

आकांक्षा दुबे वयाच्या तिसऱ्या वर्षी पालकांसोबत मुंबईत शिफ्ट झाली होती. तिच्या पालकांची तिला आयपीएस अधिकारी बनवण्याची इच्छा होती. पण तिला डान्स व अभिनयात रस होता. लहानपणापासूनच तिला टीव्ही पाहणे पसंत होते. यामुळे तिचे पाऊल सीनेजगताकडे वळले. मुंबईत शिक्षण घेतल्यानंतर आकांक्षाने चित्रपटांत आपले करिअर सुरू केले. यासाठी तिला तिची मैत्रीण पुष्पांजली पांडेने मदत केली.

यासंबंधीच्या वृत्तानुसार, आकांक्षा दुबेने वयाच्या 17 व्या वर्षी भोजपुरी सिनेमात पाऊल ठेवले. तिथे तिने डायरेक्टर आशी तिवारीसोबत काही चित्रपटांत काम केले. तिला अनेकदा रिजेक्शनचा सामना करावा लागला. यामुळे 2018 मध्ये ती नैराश्यात गेली होती. त्यानंतर तिने फिल्मी पडद्यापासून अंतर राखले. नव्या अभिनेत्यांना सापत्न वागणूक मिळत असल्याचा आरोपही तिने केला होता. यामुळे मोठी खळबळ माजली होती.

आईमुळे चित्रपटांत पुनरागमन

आकांक्षा दुबेने चित्रपटांतील आपल्या पुनरागमनाचे श्रेय आपल्या आईला दिले होते. ती म्हणाली होती – कठीण काळात माझ्या आईने मला बळ दिले. आकांक्षाने अनेक सुप्रसिद्ध गाण्यांच्या म्युझिक अल्बममध्ये काम केले होते. 2021 मध्ये आलेले तिचे गाणे ‘तुम जवान हम लाइका’ हे गाणे ब्लॉकबस्टर हिट ठरले होते. तिने खेसारी लाल यादव यांच्यासोबत ‘नाच के मालकिनी’ व्हिडिओतही काम केले होते. तिच्या ब्लॉकबस्टर हिट गाण्यांत ‘भुअरी’, ‘काशी हिले पटना हिले’, ‘नमरिया कमरिया में खोस देब’ आदींचा समावेश आहे.

आकांक्षा दुबे सारख्या गुणी अभिनेत्रीने अचानक आपली जीवनयात्रा संपवल्यामुळे मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel