महाराष्ट्रराजकीय

अमरावती बाजार समितीत सहकार पॅनलचीच सत्ता…

अमरावती‎ २१०० कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या‎ जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या‎ अमरावती-भातकुली कृषी उत्पन्न बाजार‎ समितीवरही महाविकास आघाडी पुरस्कृत‎ सहकार पॅनलचीच सत्ता आली आहे.

ही‎ समिती ताब्यात घेण्यासाठी‎ खासदार-आमदार राणा दाम्पत्याने भाजपला‎ सोबत घेत जोरदार मोर्चेबांधणी केली होती.‎ परंतु त्यांना एकही जागा जिंकता आली नाही.‎

सहकारात काँग्रेसची पाळेमुळे घट्ट

या जय-पराजयामुळे सहकारात काँग्रेसचीच‎ पाळे-मुळे अधिक घट्ट असण्यावर‎ शिक्कामोर्तब झाले असून, इतरांना तेथे स्थान‎ नाही, हे स्पष्ट झाले आहे.‎ शुक्रवारी घोषित झालेल्या जिल्ह्यातील‎ इतर पाच समित्यांमध्येसुद्धा सहकार‎ पॅनललाच बहुमत मिळाले होते.

काँग्रेसचे‎ जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, राकाँचे सुनील‎ वऱ्हाडे, माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर‎ आणि शिवसेनेच्या (ठाकरे गट) प्रिती बंड‎ यांनी या पॅनलची धुरा सांभाळली होती.‎

जिल्ह्यातील बारापैकी उर्वरित सहा‎ समित्यांसाठी उद्या, रविवार, ३० एप्रिल रोजी‎ मतदान होत आहे. मतदानानंतर लगेच‎ निकालही घोषित केला जाईल. अमरावती‎ कृषी उत्पन्न बाजार समितीत यापूर्वीही‎ सहकार पॅनलचीच सत्ता होती. ती यानिमित्ताने‎ कायम राखली गेली आहे.‎

असे आहेत विजयी उमेदवार

सेवा सहकारी संस्था मतदारसंघ‎ १. संतोष इंगोले – ५५५ (सर्वसाधारण)‎ ‎ २. प्रताप भुयार – ५३९ – (सर्वसाधारण)‎ ३. भय्यासाहेब निर्मळ – ५२६ (सर्वसाधारण)‎ ४. किशोर चांगोले – ५२१ (सर्वसाधारण)‎ ‎ ५. हरिश मोरे – ५१० (सर्वसाधारण)‎ ‎ ६. आशुतोष देशमुख – ५०२ (सर्वसाधारण)‎ ७. नाना नागमोते – ४८३ (सर्वसाधारण)‎ ‎ ८. रेखा कोकाटे – ५९१ (महिला राखीव)‎ ९. अल्का देशमुख – ५५३ (महिला राखीव)‎ १०. सतीश गोटे – ५६८ (व्हीजे-एनटी)‎ ११. प्रकाश काळबांडे – ५५४ (ओबीसी)‎

ग्रामपंचायत मतदारसंघ

१२. प्रवीण अळसपुरे – ४७१ (सर्वसाधारण)‎ १३. श्रीकांत बोंडे – ४२४ (सर्वसाधारण)‎ १४. राम खरबडे – ४६९ (आर्थिक दुर्बल घटक)‎ १५. मिलींद तायडे – ३५१ (एससी-एसटी)‎ अडते आणि व्यापारी मतदारसंघ‎ १६. राजेश पाटील – ४४५‎ १७. प्रमोद इंगोले – ४४४‎ हमाल-मापारी मतदारसंघ‎ १८. बंडू वानखडे – २३१‎ कृषी उत्पन्न बाजार समितीत सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघातून ११, ग्रामपंचायत मतदारसंघातून‎ ४, अडते-मापारी मतदारसंघातून दोन आणि हमाल-मापारी मतदारसंघातून एक संचालक‎ निवडावयाचा होता. यातील शेवटचे तीन संचालक हे स्वतंत्रपणे निवडणूक मैदानात होते.

15 जागा सहकार पॅनलच्या पारड्यात

तर उर्वरित‎ १५ जागांसाठी दोन्ही पॅनलने उमेदवार उभे केले होते. परंतु मतदारांनी मात्र सर्वच्या सर्व पंधराही जागा‎ सहकार पॅनलच्या पारड्यात टाकल्या.

आगामी निवडणुकीची रिहर्सल

जिल्ह्यातील कृषी उत्पन्न‎ बाजार समितीच्या या निवडणुकीकडे आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था‎ आणि त्यानंतर होणाऱ्या लोकसभा-विधानसभा निवडणुकीची रिहर्सल म्हणून पाहिले जात आहे.‎

…म्हणून त्यांना‎ मतदारांनी फटकारले‎

खासदार-आमदार राणा आणि त्यांच्या‎ सोबतीला बसलेल्या भाजपवाल्यांनी‎ जिल्ह्यात वेळोवेळी शेतकरीहिताची भूमिका‎ न घेता केवळ आव आणण्याचा प्रयत्न केला.‎ त्याचा राग मतदारांनी व्यक्त केला आहे. राणा‎ दाम्पत्याने हनुमान चालिसाचे राजकारण‎ केले. त्यासाठीचा योग्य धडाही त्यांना या‎ निवडणुकीतून मिळाला आहे.‎ अॅड. यशोमती ठाकूर, आमदार तथा‎ माजी पालकमंत्री, अमरावती.‎

आज येथे होणार‎ निवडणूक‎

जिल्ह्यात एकूण १२ कृषी उत्पन्न बाजार‎ समित्यांची निवडणूक घोषित झाली‎ आहे. यापैकी सहा ठिकाणची‎ निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली असून‎ उर्वरित सहा ठिकाणी उद्या, रविवार,‎ ३० एप्रिल रोजी मतदान व मतमोजणी‎ केली जाईल. यामध्ये अचलपूर,‎ चांदूरबाजार, वरुड, दर्यापूर, धारणी व‎ धामणगाव रेल्वे कृषी उत्पन्न बाजार‎ समितीचा समावेश आहे.‎

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel