आंतर जिल्हा घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास, शहर गुन्हे शाखेकडुन अटक.
दिनांक 15/07/2024 रोजी, संध्याकाळी 07.00 ते 07.40 वा. चे दरम्यान, वसंत विहार येथील, सायली हाईटस अपार्टमेंट मधील, फ्लॅटचे कुलुप तोडुन, घरातील सोन्याचे दागिने चोरी झाले बाबत, फिर्यादी सौ. कुसूम मिश्रा यांनी दिलेल्या तक्रारीवरुन, फौजदार चावडी पोलीस स्टेशन, सोलापुर शहर येथे गुरनं. 446/2024, भारतीय न्याय संहिता कलम 331(4), 305 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
त्याअनुषंगाने, दिनांक 20/07/2024 रोजी, गुन्हे शाखेकडील स.पो.नि. विजय पाटील व त्यांचे तपास पथक यांना, खात्रीशिर बातमी मिळाली की, एक इसम हा, चोरीचे सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी मार्केट यार्ड पुढील, जनावरांच्या दवाखान्यासमोर, हैद्राबाद रोड, सोलापुर येथे थांबला आहे. प्राप्त बातमीची खात्री करुन, स.पो.नि./विजय पाटील व त्यांचे तपास पथक हे, सदर ठिकाणी जावुन, नमुद इसमास ताब्यात घेतले. नमूद इसमाचे नाव- सुखदेव ऊर्फ बंडू हणमंत नाईक, वय- 26 वर्ष, रा.मु. खोराडी वस्ती, पोस्ट- आरग, ता. मिरज, जि.सांगली असे असुन, त्यावेळी, त्याचे ताब्यातुन, सोन्याच्या बांगडया, चैन व तीन अंगठ्या असे एकुण 53 ग्रॅम वजनाचे, 1,71,000/- रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
सदरची कामगिरी, मा. श्री. एम राज कुमार, पोलीस आयुक्त, सोलापूर शहर, डॉ. दीपाली काळे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री. राजन माने, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री.सुनिल दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली, स.पो.नि./ विजय पाटील व पोलीस अंमलदार दिलीप किर्दक, राहुल तोगे, आबाजी सावळे, अजिंक्य माने, धिरज सातपुते, विष्ठ्ठल यलमार, प्रविण शेळकंदे, वसिम शेख, शांतीसागर जेनुरे तसेच सायबर पोलीस ठाणेकडील प्रकाश गायकवाड व मच्छिद्र राठोड यांनी केली आहे.