आकांक्षा दुबेच्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला, बॉयफ्रेंडला लवकरच होणार अटक?
आकांक्षा दुबे आणि समर सिंह लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते आणि एकाच घरात राहत होते, असे पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासात समोर आले आहे. दोघे वाराणसीच्या तक्तकपूर येथील घरात एकत्र राहत होते. ‘आज तक’च्या वृत्तानुसार, पोलिसांना शंका आहे की आकांक्षा दुबे आणि समर सिंह यांचे ब्रेकअप झाले असावे, त्यानंतर अभिनेत्री स्वतःला सांभाळू शकली नसावी आणि डिप्रेशनमध्ये गेली असावी. नैराश्यातून आकांक्षाने आत्महत्येसारखे पाऊल उचलले असावे, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
पण सध्या ठोसपणे काहीही सांगणे कठीण आहे. समर सिंग आता पोलिसांच्या रडारवर आहे. आत्महत्येच्या रात्री समरसोबत आकांक्षा एका पार्टीत सहभागी झाली होती. आता समर सिंगला पकडण्यासाठी अनेक पोलिस पथके रवाना झाली आहेत.
पण अज्ञात व्यक्तीमुळे म्हणा किंवा मिस्ट्री मॅन म्हणा, आकांक्षा दुबेच्या मृत्यूचे प्रकरण गुंतागुंतीचे होत चालले आहे. असे सांगितले जात आहे की, ज्या दिवशी (26 मार्च) आकांक्षा दुबेने आत्महत्या केली, त्या दिवशी पहाटे 2 वाजता एक व्यक्ती अभिनेत्रीला हॉटेलमध्ये सोडण्यासाठी आला आणि 17 मिनिटे तिथे थांबला. पण ही व्यक्ती कोण होती आणि तो तिथे का आला होता आणि इतका वेळ का राहिला? आकांक्षा दुबेशी त्याचे काय नाते होते? हे समोर आलं नसून पोलिसही आता त्याचा तपास करत आहेत.