सोलापूर बातमीमहाराष्ट्रशैक्षणिकसोलापूर सामाजिक

जनक्रांती पत्रकार संघ व बशीरुज्जमां सामाजिक संस्थेच्या पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार….

जनक्रांती पत्रकार संघ व बशीरुज्जमां सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात पार पडला.या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर.महेश अण्णा कोठे, माजी आमदार नरसय्या आडम मास्तर, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, शिवसेना पक्षाचे अध्यक्ष अमोल शिंदे, अथहर ब्लड बँक चे सचिव . कय्युम इनामदार, पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार, लोकप्रधानचे संपादक अयाज शेख, तहसीन शेख. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे राष्ट्रीय सचिव फारूक मटके सर,अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब तांबोळी, लोकप्रहार चे संपादक जमीर शेख, मुनाफ शेख,महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन पश्चिम विभागाचे खजिनदार प्रशांत खलीपे, ए आय एम आय एम चे अध्यक्ष फारुखभाई शाबदी, एजाज मंजुरालम, आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम बशीरुज्जमां सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व जनक्रांतीचे जिल्हाध्यक्ष रिजवान शेख यांनी आपल्या प्रस्तावनेत सामाजिक कार्याचा आढावा सादर केले वाचे कार्यक्रम चे महत्व पटवून दिले. मानकर्तुत्वाच्या व सन्मान नेतृत्वाचा या उद्देशाने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले पुरस्कार पुरस्कृत मान्यवरांना राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले निस्वार्थपणे आज समाजामध्ये जे लोक काम करतात त्यांचे गौरव करणे व त्यांच्या पाठीवर थाप देणे हाच आमच्या संस्थेचा उद्देश आहे . या पारितोषिक वितरण मध्ये समाजरत्न, जीवनगौरव ,आदर्श विधीज्ञ ,आदर्श साहित्यिक, आदर्श मुख्याध्यापक ,आदर्श समाजसेवक, आदर्श शिक्षण विस्तार अधिकारी, आदर्श फार्मसीसट ,आदर्श शिक्षक, आदर्श क्रीडा प्रशिक्षक, आदर्श क्रीडा शिक्षक, आदर्श डॉक्टर, आदर्श संस्था, आदर्श कवी ,आदर्श माता ,आदर्श पत्रकार, यांच्या सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जनक्रांती पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रिजवान शेख ,संस्थापक अध्यक्ष प्रसाद जगताप , पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार, मुनाफ शेख,वसीमराजा बागवान, जिशान शेख, फरदीन शेख, जुल्फिकार वडडो, आदींनी परिश्रम घेतल. कार्यक्रम सूत्रसंचालन चांदसाब मुजावर यांनी केले तर आभार एजाज मंजूर आणि यांनी मांनले.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel