धैर्यशील मोहिते पाटील विजयी ? खासदार म्हणून झळकले बॅनर…
माढा लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून निवडणूक लढवत असणारे धैर्यशील मोहिते पाटील सध्या दहा हजार मतांपेक्षा जास्त आघाडीवर असल्याने त्यांचा मूळ गाव असणाऱ्या अकलूज मध्ये जागोजागी त्यांचे भावी खासदार म्हणून बॅनर लावण्यात आले आहे….
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच तुतारी या चिन्हावर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिल्याने धैर्यशील मोहिते पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात प्रचार करत प्रत्येक गाव पिंजून काढला आहे… मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच धैर्यशील मोहिते पाटील हे आघाडीवर असल्याने अकलूज सह माढा मतदार संघात मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांकडून जल्लोषाची तयारी करण्यात येत आहे तर दुसरीकडे अकलूज मध्ये त्यांच्या समर्थकांनी थेट खासदार धैर्यशील मोहिते पाटील अशा प्रकारचे बॅनर झळकल्याने संपूर्ण परिसरात चर्चेला ऊत आले आहे…