क्राईम

प्रेयसीवर पेट्रोल टाकून प्रियकराने गळफास लावून आत्महत्या…

प्रेयसीवर पेट्रोल टाकून प्रियकराने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी चंद्रपूरमधील मूल येथे घडली. या घटनेने मूलमध्ये खळबळ उडाली आहे. गळफास लावून आत्महत्या करणा-या मृतकाचे नाव बंडू उर्फ रामचंद्र निमगडे (वय 45) असे आहे.

प्रेयसीला जिवानीशी मारण्याचा प्रयत्न

मृतक रामचंद्र निमगडे हे मूल येथील रहिवासी आहे. त्याचे घराशेजारी राहणाऱ्या एका विवाहीत महिलेशी ब-याच वर्षापासून प्रेमसंबध होते. याच कारणामुळे मृतकाच्या घरी नेहमी भांडणे व्हायची. घटनेच्या दिवशी सोमवारी दुपारी तणावामध्ये असताना बंडू निमगडे यांने एका बाटलीमध्ये पेट्रोल आणून प्रेमसंबध असलेल्या प्रेयसीच्या घरी जावून तिच्या अंगावर पेट्रोल टाकले व प्रेयसीला जिवानीशी मारण्याचा प्रयत्न केला.

तणावात घेतला गळफास

प्रेयसीवर पेट्रोल टाकल्यानंतर तणावामध्ये असताना निमगडे याने वार्ड क्र.11 मधील राहत्या घरी येवून स्वतः गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना दुपारी तीन वाजेच्या दरम्यान घडली. पेट्रोल टाकून जखमी झालेल्या महिलेला मूलमध्ये प्राथमिक उपचार करून चंद्रपूर येथे पुढील उपचारार्थ भरती करण्यात आले आहे.

दरम्यान,घटनास्थळी जिल्हा पोलिस अधिक्षक यांनी भेट दिली. जिवानिशी मारण्याचा प्रयत्न केल्याने मृतक बंडू निमगडे यांच्या विरूदध 307 चा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास प्रभारी ठाणेदार बन्सोड हे करीत आहेत.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel