बहुजन शिक्षक महासंघाच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा…
महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाच्यावतीने धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भारशंकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महासंघाचे राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधिप्रकाश गायकवाड, राज्य उपाध्यक्ष प्रकाश शिंदे व रमेश लोखंडे, राज्यकोषाध्यक्ष नीलकंठ शिंगे, जिल्हाध्यक्ष युवराज भोसले, राम गायकवाड, नागेश सातपुते अभिजीत भंडारे, महेश क्षीरसागर, राजकुमार वसेकर, राम गायकवाड, संजयकुमार शिवशरण, शुभम इंगळे, आसिफ कंदलगावकर, इरफान शेख, सुभाष काकडे, सिद्धेश्वर भुरांडे, आगतराव बनसोडे, मेहबूब तांबोळी, निर्मला मौळे, इन्नूस बाळगी, स्वप्नजा कसबे, शिवानंद चौगुले, फरिदा बेलीफ, एकोराम चौगुले यांच्यासह इतर पदाधिकारी व सभासद उपस्थित होते. याप्रसंगी संघटनेतील अनेक पदाधिकारी व सभासदांनी धम्मचक्र प्रवर्तन या विषयी मत व्यक्त केले. यानंतर महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना यांच्यावतीने युवराज भोसले यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या अभिवादन सभेचे प्रास्ताविक रवी देवकर यांनी केले तर मुख्याध्यापक नितीन गायकवाड यांनी आभार मानले.