क्राईममहाराष्ट्रसोलापूर क्राईमसोलापूर बातमी

ब्रेकिंग:-जोडभावी पेठ पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने बॅटरी चोरी करणाऱ्या दोन आरोपीना अटक करुन दोन गुन्हे उघडकीस आणुन २४२००/- रुपयाचे मुददेमाल हस्तगत….

जोडभावी पेठ पोलीस ठाणेच्या हददीत बॅटरी चोरीचे प्रमाणे वाढल्याने मा. वरिष्ठ पोलीस निरिक्षक सारे, सुहास चव्हाण साहेब यांनी डी. बी. पथकाला आदेशीत केल्याने डी. बी. पथकाचे प्रमुख सपोनि पडसळकर साहेब यांचे मार्गदर्शना खाली डी.बी. पथकासह हददीत पेट्रोलिंग करीत असताना पोहेको १३७०शिवशरण व पोकॉ/१५५६ सरवदे यांना विश्वासनिय बातमी मिळाले की, शेळगी ब्रिजच्याखाली दोन इसम मोटार सायकल वरुन चोरीचे बॅटऱ्या घेवुन विक्री करण्या करीता आलेले आहे असे बातमी मिळाल्याने डी. बी. पथक तेथे जावुन त्यांना शिताफितीने ताब्यात घेवुन त्यांचे नांव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नांव १) समीर मोहम्मद नदाफ वय-२४ वर्षे व्यवसाय-मजुरी रा-मराठा वस्ती भवानी पेठ सोलापुर तसेच काळा शर्ट घातलेला इसम २) आशिफ शरिफ नदाफ वय-३६ वर्षे व्यवसाय-मजुरी रा-केकडे नगर मुळेगांव रोड एमआयडीसी सोलापुर असे असल्याचे सांगितले तेंव्हा त्याचे ताब्यातील विविध कंपनीचे चार बॅटऱ्या बाबत विचारणा केले असता त्यांनी चोरी केल्याचे कबुली दिली.

ही कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त श्री.एम. राजकुमार साो, पोलीस उप-आयुक्त साो. (परिमंडळ) श्री. विजय कवाडे साो, सहा. पोलीस आयुक्त विभाग-१ श्री. अशोक तोरडमल साो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुहास चव्हाण साो, पोनि/शबनम शेख साो (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली जोडभावी पेठ पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख, सपोनि/पडसळकर, पोहेकॉ/१३७० शितल शिवशरण, पोहेकॉ/१६८५ खाजप्पा आरेनवरु, पोहेकॉ/१०७६ श्रीकांत पवार, पोहेकॉ/९९३ विठठल पैकेकरी, पोकॉ/६१३ स्वप्नील कसगावडे, पोकॉ/१५६५ दादासाहेब सरवदे, पोकों/९८ अभिजीत पवार, पोकॉ/१६५७ निलेश घोगरे, पोकॉ/१६२४ मल्लिनाथ स्वामी, पोकॉ/१३२१ स्वामी यांनी पार पाडली आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel