सोलापूर बातमीमहाराष्ट्रसोलापूर महानगरपालिकासोलापूर सामाजिक
मा. आयुक्त यांच्या निवासस्थानी पर्यावरण पूरक गणपतीची प्राणप्रतिष्ठापना…..
सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या निवासस्थानी आज पर्यावरण पूरक श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.यावेळी डॉ. बसवराज तेली,शहाजी उगले, संजीवनी उगले, चिरंजीव आदित्य सह परिवार उपस्थित होते. यावेळी मा आयुक्त व परिवाराच्या शुभहस्ते श्री गणेशाची मनोभावे आरती करण्यात आली.पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यानी शहरातील नागरिकांनी आपल्या घरी पर्यावरण पूरक गणेश मूर्ती प्रतिष्ठापना करून घरातच विसर्जन करावे, असे आवाहन केले.तसेच सोलापूर शहरातील तमाम नागरिकांना,मंडळांना श्री गणेश उत्सवाच्या या वेळी आयुक्तांनी शुभेच्छा दिल्या