राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा कामगार संघटना महासंघाचे निदर्शने
राज्यात कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे कामगार विभागावर नियंत्रण नसल्यामुळे कामगारांच्या कल्याणकारी योजना व त्यांचे विकास आणि संरक्षण होत नाही. कामगार विभाग मंत्रालय मुंबई, राज्याचे कामगार आयुक्त कार्यालय आणि इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई आणि सहाय्यक कामगार आयुक्त सोलापूर कार्यालयात अधिकारी, कर्मचारी वेळेवर येत नाही.
मनमानी लहरी पध्दतीने कामकाज चालू आहे. त्यामुळे शासनाने कामगारांसाठी लागू केलेले कल्याणकारी योजना व कायद्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे शासनाचे मुळ उद्देश सफल होत नसल्याने कामगार मंत्री सुरेश खाडे यांची मंत्री मंडळातून हकालपट्टी करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी कामगार संघटना महासंघाचे अध्यक्ष साथी बशीर अहमद यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद पुनम गेट येथे निदर्शने करत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना उपजिल्हाधिकारी (महसूल) अमृत नाटेकर यांच्यामार्फत समक्ष भेटून निवेदन सादर करण्यात आले.
यावेळेस कामगार संघटना महासंघाचे अध्यक्ष साथी बशीर अहमद, शिवसेना कामगार आघाडी (शिंदे गट) चे अध्यक्ष सायबण्णा तेगेळ्ळी, समता मजदूर युनियनचे अध्यक्ष साथी छगन पंढरे, संघर्ष कामगार संघटनेचे अंगद जाधव, राष्ट्रीय मुननिवासी बहुजन कर्मचारी संघाचे सिध्दार्थ बोराडे, मिलिंद गायकवाड, औद्योगिक कामगार सुरक्षा युनियनचे अशोक कांबळे, लेबर पार्टीचे जिल्हाध्यक्षा सत्यव्वा गायकवाड, रफिक तांबोळी, जनरल कामगार युनियनचे कॉ. एजाज शेख, बाबा बागवान, महाराष्ट्र राज्य लेबर युनियनचे महेबूब शेख, अशपाक शेख, रंगनी कामगार युनियनचे कॉ. शंकर तुम्मा, लेबर पार्टीचे कॉ. चंद्रकांत बदलापूरे, मुज्जो पठाण, भिमशक्ती शिवशक्ती कामगार संघटनेचे साथी नितीन कांबळे, शिवाजी कांबळे, सुगतपाल कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. अशी माहिती महासंघाच्या प्रसिध्दी पत्रकात देण्यात आली आहे.