महाराष्ट्र

रामनवमीच्या मिरवणुकीवर दगडफेक, गुजरातच्या वडोदऱ्यात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात

गुजरातच्या वडोदऱ्यात गुरुवारी रामनवमीच्या मिरवणुकीवर काही समाजकंटकांनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेऊन स्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी काही समाजकंटकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

विहिंप, बजरंग दलाने काढली मिरवणूक

यासंबंधीच्या माहितीनुसार, वडोदऱ्यात विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने गुरुवारी रामनवमीच्या निमित्ताने मिरवणूक काढली. ही मिरवणूक फतेपुरा पांजरीगर मोहल्ल्यात पोहोचली असता अचानक दगडफेक सुरू झाली. यावेळी समाजकंटकांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या एका ट्रकसह अन्य वाहनांची तोडफोड सुरू केली.

या घटनेची माहिती मिळताच परिसरातील व्यापारी प्रतिष्ठाने बंद केली. पोलिसांनी स्थिती नियंत्रणाबाहेर जाण्यापूर्वीच घटनास्थळी धाव घेतल्यामुळे मोठा प्रसंग टळला. सध्या या भागात तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांनी आता सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर आरोपींचा शोध सुरू केला आहे. शहरात मोठ्या प्रमाणात पोलिस रस्त्यावर उतरलेत.

हा व्हिडिओ वडोदऱ्यातील दगडफेकीनंतरचा आहे. त्यात रस्त्यावर दगडांचा खच दिसून येत आहे.

शांतता समितीची बैठक झाली
सध्या मुस्लिम समाजाचा रमजानचा महिनाही सुरू आहे. त्यातच विहिंप व बजरंग दलाच्यावतीने मिरवणूक काढण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे पोलिसांनी दोन्ही समाजाच्या नेत्यांसह शांतता समितीचीही बैठक घेतली. यावेळी दोन्ही समुदायांना शांततेचे आवाहन करण्यात आले. पोलिसांनी बुधवारी रात्री या भागात गस्तही घातली होती.

काय म्हणाले पोलिस?

वडोदराचे DCP यशपाल जगनिया यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, वडोदऱ्यात रामनवमीची शोभा यात्रा काढली जात होती. ही मिरवणूक शहरातील एका मशिदीजवळ आल्याने थोडाफार तणाव निर्माण झाला होता. पण त्याहून अधिक कोणतीही समस्या नाही. परिसरात शांतता आहे. नागरिकांना त्यांच्या घरी पाठवण्यात आले आहे. कोणीही जखमी झाले नाही. घटनास्थळी पोलिस बंदोबस्त असून, मिरवणूक पुढे गेली आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel