महाराष्ट्र

लव्ह जिहादच्या संशयावरून एका युवकाला 15 जणांच्या टोळक्याने मारहाण

सोलापुरात लव्ह जिहादच्या संशयावरून एका युवकाला 15 जणांच्या टोळक्याने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी तरुणाने सोलापूर पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली असून टोळक्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमच्या धर्माच्या मुलीला फसवतो का? असे म्हणत ही मारहाण करण्यात आल्याचा आरोप पीडित युवकाने आपल्या फिर्यादित केला आहे. या सर्व आरोपीं विरोधात भादंवि कलम 363, 324, 341, 143, 147, 149, 504 आणि 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?

मुलीस बोलण्याच्या कारणावरुन‎ दुचाकीवरून अपहरण करून तरुणास लाकूड व‎ दगडाने मारहाण केल्याकरणी एका संशयित‎ आरोपीला पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी‎ जखमी असम महमद शरीफ फुलमामडी याने‎ दिलेल्या फिर्यादीवरून संशयित 15 जणांविरुद्ध‎ जेल रोड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.‎ गुरुवारी न्यायालयाने अटकेतील आरोपीस‎ जामीन मंजूर केला. एका महाविद्यालयातून‎ बुधवारी दुपारी 2.45 वाजता तरुणीसोबत‎ दुचाकीवर फिर्यादी जात असताना जमावाने‎ अडवून आमच्या मुलीला फसवतो का, म्हणत‎ मारहाण केली. नंतर नारळ पाणी पाजवून रिक्षात‎ पाठवून दिले.

घटनेची माहिती मिळताच सोलापूर शहर पोलिसांनी ताबडतोब तपास करत एका आरोपीला अटक केली. पोलिस उपायुक्त विजय‎ कबाडे म्हणाले, समाजामध्ये तेढ निर्माण‎ करणाऱ्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे.‎ सोशल मीडियावरून आक्षेपार्ह संदेश‎ पाठविणाऱ्यांवर सायबर विभाग लक्ष ठेवून आहे.‎ इतर आरोपीची देखील ओळख पटली असून कायदेशीर कारवाई सुरु असल्याची माहिती सोलापूर पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांनी दिली.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel