वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे वाढदिवस, जिल्हा किशोर खो खो स्पर्धा…
किशोर व किशोरी गटाची जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो- खो स्पर्धेत किशोर गटात न्यू सोलापूर क्लब, शेवते पंढरपूर, लोकविकास वेळापूर व दिन बंधू मंद्रूप या संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला.
सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने व डीएनपी स्पोर्ट क्लब पिराची कुरोली (जि. पंढरपूर) यांच्या वतीने सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा पिराची कुरोली येथील संत तुकाराम महाराज पालखी तळ मैदानावर सुरु झाली. या स्पर्धेत किशोर गटात २० व किशोरी गटात १२ संघांनी भाग घेतला आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या हस्ते झाले. यावेळी शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते श्रीकांत ढेपे, कारखान्याचे संचालक परमेश्वर लामकाने, गुरसाळे येथील यशवंतराव चव्हाण पतसंस्था माजी संचालक रामचंद्र कौलगे, श्रमिक मुक्तिदल जिल्हाध्यक्ष मोहन अनपट, माजी सैनिक ज्ञानेश्वर कौलगे, किसन कौलगे, गणेश दूध डेएरीचे चेअरमन पांडुरंग कौलगे, प्रगतशील बागायतदार विठ्ठल काळे, विकास कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन वामन सावंत, मुख्याध्यापक नंदकुमार दुपडे, शहाजी कोलगे, सचिन कोलगे, स्वप्निल काळे, गोरख काळे, डीएनपी स्पोर्ट्स क्लबचे दिनेश कौलगे, नौशाद मुजावर, पांडुरंग कौलगे, सुग्रीव काळे, सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशनचे सचिव ए. बी. संगवे, खजिनदार श्रीरंग बनसोडे, राज्य पंच मंडळ सदस्य शरद व्हनकडे, पंचमंडळ सचिव गोकुळ कांबळे, तांत्रिक समिती सचिव उमाकांत गायकवाड, पंचप्रमुख राहुल माशाळकर, सोमनाथ बनसोडे, सुरेश भोसले आदी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्राच्या किशोरी खो खो संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाल्याबद्दल वाडीकुरोलीचे अतुल जाधव यांचा सत्कार करण्यात आला.