राजकीय

संजय राऊत यांना 100 कोटींच्या मानहानीची नोटिस…!

ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात केलेले आक्षेपार्ह वक्तव्य संजय राऊत यांना चांगलेच भोवणार आहे. संजय राऊत यांना आता 100 कोटींची मानहानीची नोटीस पाठवण्यात आली आहे.

‘लोकनेते एकनाथ संभाजी शिंदे फाऊंडेशन’चे अध्यक्ष अमर विनायक लोखंडे यांनी संजय राऊत यांना ही नोटीस पाठवली आहे. संजय राऊत यांनी वेळोवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात बदनामीकारक आणि आक्षेपार्ह असे वक्तव्य केल्याचा आरोप संजय राऊत यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

सत्तांतरानंतर निशाण्यावर

महाराष्ट्रातील सत्तानाट्य संपूर्ण देशभरात गाजले. आता मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे त्यावेळी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीत होते. मात्र अचानकच 40 आमदारांना घेऊन शिंदेंनी शिवसेनेला सुरुंग लावला. त्यानंतर गुवाहाटी, गोवा असे फिरत सर्व आमदार मुंबईला परतले. महाविकास आघाडीला सत्तेतून पायउतार व्हावे लागले. त्यानंतर भाजपसोबत हातमिळवणी करत शिंदेंनी सत्ता स्थापन केली. नंतर निवडणुक आयोगाने शिवसेना नाव आणि चिन्ह देखील शिंदे गटाला दिले.

खोके, मिंधे गट

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून संजय राऊत त्यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही. खोके, मिंधे गट अशा खोचक शब्दांमध्ये संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना डिवचले. त्याचबरोबर वेळोवेळी राऊत यांनी शिंदेंवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. त्यांनी केलेल्या आरोपांना आता छत्रपती संभाजीनगर येथील अमर विनायक लोखंडे यांनी 100 कोटींच्या मानहानीची नोटिस आपल्या वकिलामार्फत पाठवली आहे.

नोटीसीत काय?

या नोटीसीत म्हटले आहे की, एकनाथ शिंदे यांचा समाजात अवमान होईल, बदनामी होईल असे वक्तव्य संजय राऊत यांच्याकडून करण्यात आले आहेत. तसेच संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे समाज माध्यमांवरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बदनामी होत असल्याचा दावा अमर लोखंडे यांनी केला आहे.

राऊतांना धमकी

ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने संजय राऊत यांच्या मोबाइलवर संदेश पाठवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यानंतर संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel