क्राईमसोलापूर क्राईमसोलापूर बातमी

सोलापुरातील जोडभावी पेठ DB पथकाने २४ तासात चोरी करणाऱ्या नोकरास केले अटक

जोडभावी पेठ पोलीस ठाणे कडील डी बी पथकाने २४ तासाच्या आत सोनाराचे दुकानात चोरी करणाऱ्या नोकरास अटक करुन गुन्हा उघडकीस आणुन त्याच्या ताब्यातुन ०५ तोळे ०३ ग्रॅमचे सोने (३,८४,०००) रुपयाच मुददेमाल हस्तगत करुन दमदार कामगीरी केलेली आहे.

जोडभावी पेठ पोलीस ठाणे सोलापुर शहर गुन्हा रजि. नं. ४०८/२०२४ बी.एन.एस. कलम ३०६ प्रमाणे दिनांक-२२/०७/२०२४ रोजी गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्हयाचे तपास मा. वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुहास चव्हाण यांनी सपोनि सोमनाथ पडसळकर साो यांना दिल्याने त्यांनी सदर गुन्हयाचे पुढील तपासकरीत आहेत.

सदर गुन्हयातील फिर्यादी नामे सुप्रिया संगमेश्वर स्वंत वय-३५ वर्षे व्यवसाय-सोनार व्यापार रा ८७/३५/१भवानी पेठ सिध्देश्वर हौसिंग सोसायटी सोलापुर यांचे गुरुमहाराज संगमेश्वर ज्वेलर्स नावाचे दुकान ४१८ पुर्व मंगळवार पेठ सराफ कटटा वारद बोळ सोलापुर येथे सोन्याचे दुकान आहे त्यांचे दुकानात काम करणारा कामगार (आरोपी) नांम विजय बालाजी कोंडा चय-३४ वर्ष व्यवसाय सोनार कारागीर रा-लक्ष्मी नरसिंह झोपडपटटी अशोक चौक सोलापुर यांनी दिनांक. १६/०७/२०२४ रोजीचे फिर्यादी यांचे दुकानातील कपाटा मधुन सोन्याचे गंठण, नेकलेस, कानातील एअर रिंग असे एकुण ५३ ग्रॅमचे सोन्याचे दागिने चोरी केल्याने यातील फिर्यादी यांनी विजय बालाजी कोंडा यांचे विरुध्द वरील प्रमाणे गुन्हा दाखल केले होते.
मा. वरिष्ठ पोलीस निररिक्षक साो सुहास चव्हाण साहेब यांनी सदर गुन्हयातील आरोपी नांम-बिजय बालाजी कोंडा यांचे शोच घेवुन कारवाई करणे कामी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सपोनि/श्री पडसळकर साहेब यांना आदेश केल्ले होते. तेव्हा श्री. सपोनि पडसळकर साहेब डी. बी. पथकास हददीत पेट्रोलींग करीत असताना पोहेको १६८५ खाजप्पा आरेनबरु यांना विश्वासनिय बातमी मिळाली की, आरोपी विजय बालाजी कोंडा हा कन्ना चौक येथील नागेश चहा केंन्टींग जवळ चोरीचे सोने विक्री करण्यासाठी आलेला आहे, अशी बातमी मिळाल्याने तेथे डी. बी. पथकाने जावुन त्यास ताब्यात घेवुन त्याचे ताब्यातुन वरील गुन्हयातील मुददेमाल हस्तगत करुन आरोपी विजय बालाजी कोंडा यास दिनांक- २३/०७/२०२४ रोजी अटक केली आहे वरील गुन्हयातील हस्तगत केलेले मुददेमालाचे वर्णन खालील प्रमाणे

१)२,५५,०००/- रु किमंतीचे अंदाजे ३.५ तोळयाचे सोन्याचे गंठण जु.वा.कि. अं. २)५९,०००/- रु किमंतीचे ०८ ग्रॅम कानातील सोन्याचे ईअररिंग जु.वा.कि.अ. ३) ७०,०००/- रु किमंतीचे ०१ तोळ्याचे सोन्याचे नेकलेस जु वा कि अ ३,८४,०००/- रु येणे प्रमाणे

सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त एम. राजकुमार साो, पोलीस उप-

आयुक्त साो. (परिमंडळ) विजय कवाडे साो, सहा पोलीस आयुक्त विभाग-१ अशोक तोरडमल साो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण सारे, पोनिःशबनम शेख साो (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली जोडभावी पेठ पोलीस स्टेशन गुन्हे

प्रकटीकरण पथकाचे प्रमुख, सपोनि पडसळकर, पोहेको १६८५ खाजप्पा आरेनवरु, पोहेकॉ/१३७०शितल शिवशरण, पोहेको ९९३ विठठल पैकेकरी, पोकों/ १३२१ बसवराज स्वामी, पोक ६१३ स्वप्नील कसगावडे, पोको १५६५दादासाहेब सरवदे, पोको ९६५७ निलेश घोगरे, पोको ९८ अभिजीत पवार, पोको १५०४ दत्ता काटे सायबर पोस्टे कडील पोहेकॉ/६०९ प्रकाश गायकवाड, पोहेको २०८ मच्छिद्रं राठोड यांनी पार पाडती आहे अशी माहिती जोडभावी पेठ पो स्टे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पत्रकार परिषदेत दिली.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel