सोलापुरात काँग्रेसच्या ‘दे धप्पा’ चीच सर्वत्र चर्चा ; प्रणितीताई व रामभाऊंच्या कार्यकर्त्यांमध्ये सोशल वॉर…
सोलापुरात काँग्रेसच्या ‘दे धप्पा’ चीच सर्वत्र चर्चा ; प्रणितीताई व रामभाऊंच्या कार्यकर्त्यांमध्ये सोशल वॉर
सोलापूर
सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी तिसऱ्या टप्प्यात मतदान झाले. हे मतदान सात मे रोजी झाले असून निकाल चार जून रोजी असल्याने तब्बल एक महिना गॅप आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. याच दरम्यान भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये सोशल मीडियावर वॉर पाहायला मिळतो. सोलापुरात आमदार राम सातपुते आणि आमदार प्रणिती शिंदे या दोन युवा आक्रमक अभ्यासू या उमेदवारांमध्ये अतिशय अटीतटीची लढत पाहायला मिळाली दोन्ही बाजूने सुद्धा सोशल मीडियावर कार्यकर्ते एकमेकांवर तुटून पडल्याचे पाहायला मिळाले. मागील दोन वडिलांच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी प्रणिती शिंदे या मैदानात उतरल्या होत्या. दुसरीकडे भारतीय जनता पार्टी माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना उमेदवारी देण्यात आली. राम सातपुते यांच्या रूपात भाजप हॅट्रिक करणार का याचीही उत्सुकता भाजप कार्यकर्त्यांना लागून आहे. मात्र प्रणिती शिंदे यांना ग्रामीण भागातून मिळालेला प्रतिसाद पाहता भाजपला हे एक प्रकारे टेन्शन आहे.
या निवडणुकीत बरीच सामाजिक समीकरणे पाहायला मिळाली. नाराज असलेला मराठा समाज, हिंदू मुस्लिम मुद्दा उपस्थित झाल्याने खवळून मतदान केलेला मुस्लिम समाज, वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम पक्ष नसल्याने आंबेडकरी समाजाने बऱ्यापैकी काँग्रेसला मतदान केल्याचे बोलले जाते. परंतु दुसरीकडे भारतीय जनता पार्टीची मते ही ठरलेली असतात, ती फुटत नाहीत असे म्हणतात. पद्मशाली समाज, लिंगायत समाज, लोधी समाज, ब्राह्मण समाज यासह इतर काही समाजामध्ये भाजपची क्रेझ पाहायला मिळाली. यंदा मतदान उत्साहाने झाले, थोडासा टक्काही मतदानाचा वाढलेला आहे. त्यामुळे हा वाढलेला टक्का कोणासाठी फायदेशीर याचा टेन्शन दोन्ही पक्षाला लागून राहिले आहे. परंतु काँग्रेस पक्षाने आता सोशल मीडियावर ‘4 जून धप्पा अनपेक्षित आणि आश्चर्यकारक आम्हीच देणार’ हे पोस्टर सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. त्या पोस्टरवरूनही काँग्रेसने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये सोशल वॉर सुरू झालेला आहे