सोलापूर बातमीमहाराष्ट्रशैक्षणिकसोलापूर सामाजिक

सोलापूरच्या वैष्णवीचा कर्नाटकात सन्मान….

सोलापूर – बी.एल.डी आयुर्वेद मेडिकल कॉलेजमध्ये सोलापूरच्या डॉ वैष्णवी गणेशकर हिचा कर्नाटकात सन्मान करण्यात आला आहे.
या मेडिकल कॉलेजमध्ये सन 2024 – 25 या वर्षात डॉ. वैष्णवी हिने मेडिकल कॉलेजमध्ये फस्ट रॅक मध्ये येऊन प्रथम क्रमांक पटकावला. या मेडिकल कॉलेजमध्ये पदवीप्रदान समारंभ आयोजित केला होता. पदवीप्रदान झाल्या नंतर उमा रेड्डी यांच्या कडून पंचवीस हजार रुपये रोख व प्रशिस्त पत्र देवून सन्मानित करण्यात आले व शल्य चिकित्सक या विषयात प्रथम क्रमांक त्यांनी मिळविला म्हणून रोख पाच हजार रुपयेचे बक्षिस म्हणून डॉ वैष्णवी हिने पटकावले. डॉ. अश्विनी यांच्या कडून हि पाच हजार रुपयेचे चरक संहिता हे पुस्तक देवून डॉ.वैष्णवी हिला सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्रातील एक विद्यार्थिनी कर्नाटकात जाऊन एवढे नाव लौकिक केल्याने तिचे कौतुक केले व त्यांना अभिनंदन करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या वेळी बी.एल.डी आयुर्वेद मेडिकल कॉलेजचे प्राचार्य संजय कडल्लीमठ्ठि व बी.एल.डी आयुर्वेद महाविद्यालयचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.
यावेळी अनेक विद्यार्थीना, डॉक्टरांना पदवीप्रदान करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित डॉक्टर यांनी शपथ देण्यात आली.
या कार्यक्रमात डॉ.वैष्णवी गणेशकर हिचे महाराष्ट्र मधील पालकांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेशातील पालक बहुसंख्येने उपस्थित होते

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel