सोलापूरात हिंदू संघटनांचे ठिय्या आंदोलन…
उरण येथे यशश्री शिंदे व तसेच धारावी (मुंबई) मध्ये बजरंग दलाचे कार्यकर्ते अरविंद वैश्य यांची यांच्या हत्येच्या विरोधात येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केले. त्या हत्येच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर शहरातील हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने ठिय्या आंदोलन घेण्यात आले.
या आंदोलनप्रसंगी बजरंग दलाचे जिल्हा सहसंयोजक नागेश प्रभाकर बंडी, बजरंग दल जिल्हा सुरक्षा प्रमुख शीतलकुमार परदेशी, विश्व हिंदू परिषद विभागमंत्री विजयकुमार पिसे, विश्व हिंदू परिषद जिल्हा मंत्री संजय कुमार जमादार, सकल हिंदू समाज समन्वयक अंबादास गोरंटला, हिंदू राष्ट्र सेनेचे रवी गोणे यांनी मनोगत मांडले.या हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. लव्हजिहाद विरोधी कायदा झालाच पाहिजे. तसेच मॉबलिचिंग विरोधी कायदा झालाच पाहिजे या मागण्या मांडल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात या मागण्याचे निवेदन देण्यात आले. हत्येत बळी पडलेल्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी जिल्हा संयोजक सिद्राम चरकुपल्ली, जिल्हा गो रक्षा प्रमुख प्रशांत परदेशी, दुर्गा वाहिनीच्या नंदिनी अक्कल, स्वाती बोल्ली, अशोक संकलेचा, वेंकटेश केंची, आनंद मुसळे उपस्थित होते.