शैक्षणिकसोलापूर बातमी
सोलापूर-दानियामेहवश रामपुरे हिच एम.बी.बी.एस. परीक्षेत यश
सोलापूर- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्यावतीने घेण्यात आलेल्या हिवाळी सत्र परीक्षा २०२३ चा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या निकालांमध्ये अश्विनी रुरल मेडिकल कॉलेज, सोलापूर येथील पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी यशस्वी निकालाची परंपरा कायम ठेवली असून त्यात एम.बी.बी.एस. अंतिम वर्षात शिकत असलेली दानियामेहवश वहाब रामपुरे हिने प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली आहे. दानियामेहवश ही डी.सी.सी. बँक बोरामणी शाखेचे शाखा व्यवस्थापक वहाब हबीबल्ला रामपुरे यांची मुलगी आहे.
एम.बी.बी.एस. परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल बागवान समाजात त्याचे कौतुक होत असून त्याला लाल मिर्चीचे व्यापारी अ. समद रामपुरे, कांद्याचे व्यापारी म. शब्बीर रामपुरे यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.