महाराष्ट्र

सोलापूर पोलिस आयुक्तालयात महत्वाची बैठक संपन्न….

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतनिमित्त विशेष बैठक

सोलापूर ( प्रतिनिधि):- सोलापूरचे  पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव- २०२४ चे अनुषंगाने सोलापूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दि. ०८/०४/२०२४ रोजी १६.३० वा. पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी, सोलापूर महानगर पालिकेकडील अधिकारी, आर टी ओ चे अधिकारी, महावितरण चे अधिकारी, शांतता समिती सदस्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव- २०२४ चे सार्वजनिक मंडळाचे पदाधिकारी व सदस्य यांची पोलीस आयुक्त कार्यालय येथे संयुक्तपणे बैठक आयोजित केली होती.

सदर बैठकीची प्रस्तावना श्रीमती डॉ. दिपाली काळे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) यांनी करुन बैठक आयोजीत करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला. दि.१४/०४/२०२४ रोजी ते दि. २१/०४/२०२४ रोजी पर्यंतचे कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव-२०२४ साजरी करण्यात येणार आहे. दि. २१/०४/२०२४ रोजी मिरवणुकीमध्ये पारंपारीक वाद्य वाजविणेबाबत सुचना देण्यात आल्या. उत्सव काळात सर्व मंडळानी सीसीटीव्ही कॅमेरेंची व्यवस्था करावी, मंडपासाठी सार्वजनिक रस्त्याचा २/३ भाग मोकळा सोडावा. मोकाट जनावरांपासुन मुर्ती/फोटोस धोका होणार नाही याची खबरदारी घ्यावी. देखावे चित्र आक्षेपार्ह नसावेत, उत्सवाचे पावित्र्य राखावे, मंडळांकडुन जाहिरात प्रदर्शन करण्यात येत असल्यास आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंदी द्यावी. तसेच स्वच्छता, जलसंवर्धन, वृक्षारोपण, साक्षरता, सायबर गुन्हेगारी यंत्रणाबाबत जनजागृती करावी. मा. सर्वोच्च न्यायालयाचे ध्वनीप्रदुषण अनुषंगाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे. मंडाळांनी महावितरण विभागाकडुन अधिकृत विद्युत जोडणी करुन घ्यावी जेणेकरुन मंडपामध्ये शॉर्ट सर्कीट होवून इजा अथवा धोका होणार नाही याची दक्षता घ्यावी. सर्व मंडळांनी मिरवणुकीत सामिल होणाऱ्या वाहनांची आर टी ओ कडुन तपासणी करावी. मिरवणुकीमध्ये मोठे व लांब कंटेनर वापरु नये, वाहनांवरील देखाव्यांची उंची अडथळा होणारी नसावी. मिरवणुक संवेदनशिल ठिकाणी जास्त वेळ रेंगाळत ठेवू नये. इतर धर्माच्या भावना दुखावणार नाही यांची काटेकोर दक्षता घ्यावी मंडळाने स्थापन केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती यांचे मुर्ती समोर स्वयंसेवक सतत हजर राहतील व मुर्तीची देखभाल करतील याची पुरेपुर काळजी घ्यावी. सोशल मिडीयावरुन काही अक्षेपार्ह मेसेजेस, फोटो, पोस्ट व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबत त्वरीत पोलीस यंत्रणेस कळवावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव-२०२४ मंडळानी ऑनलाईन, ऑफलाईन पध्दतीने परवानगी घेणे बंधनकारक आहे याची नोंद घ्यावी. ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणीकरीता प्रत्येक पोलीस ठाणे येथे स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. पोलीसांनी दिलेल्या सुचनांचे पालन करावे.

त्यानंतर बैठकीस उपस्थित शांतता समिती सदस्य व इतरांनी समस्या/सुचना मांडल्या. त्यानंतर सदर सुचनेचे संबंधित महानगरपालिका, महावितरण, आर टी ओ, धर्मादाय आयुक्त कार्यालय अशा खात्याचे अधिकारी यांनी सदर कामाची रूपरेषा बघुन समस्या सोडविण्यात येतील असे सांगितले.

सदर शांतता समिती बैठकीमध्ये सन २०२४ मधील शिवजयंती उत्सव मंडळ यांनी पारंपारिक वाद्याचा वापर करून डी. जे विरहित शांततेत मिरवणुक काढून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे सदर मंडळाचे नावे १) माऊली युवा प्रतिष्ठान, मल्लिकार्जुन नगर अक्कलकोट रोड सोलापूर (भजनी मंडळ), २) पत्रा तालीम युवक मंडळ सोलापूर (लेझीम पथक), ३) जय बजरंग तरूण मंडळ गवळीवस्ती सोलापूर (लेझीम पण्थक), ४) धर्मवारी संभाजी तालीम जुनी पोलीस लाईन (लेझीम पथक). ५) शिवालय बहुउद्देशीय संस्था (लेझीम पथक), ६) शिव सम्राज्ञी प्रतिष्ठान रेमंड दुकानाजवळ (लेझीम पथक), ७) जय महाराष्ट्र तरूण मंडळ जुनी लक्ष्मीचाळ सोलापूर (लेझीम पथक) यांना पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर यांच्या मार्फतीने प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

मा. पोलीस आयुक्त साो यांनी बैठकीस उपस्थित लोकांचे स्वागत करुन मांडलेल्या अडी-अडचणीचे निरसण केले. उत्सव साजरा करताना बऱ्याचवेळी कायदेशीर बाबींचे उल्लंघन होत असते, कोणीही कायदा हातात घेऊ नये. कोणताही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास पोलीसांशी संपर्क साधावा, शांतता समिती

सदस्य व नागरीकांनी आपल्या परीसरातील बेकायेदशीर बाबींची माहिती पोलीसांना दिली पाहिजे. मिरवणुकीमध्ये अफवा पसरवू नये, नियमांचे पालन करावे, नियमांचे पालन नाही झाले तर कायदेशीर कारवाई होईल. शासनाने नेमून दिलेल्या सुचना पाळल्या पाहिजेत. तसेच योग्य तो बंदोबस्त नेमू असे सांगून डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शुभेच्छा देवून बैठकीला उपस्थितांचे आभार मानले.

सदर बैठकीस, मा. पोलीस आयुक्त श्री. एम राजकुमार, मा. श्री. अजित बोन्हाडे, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय), मा. श्रीमती डॉ. दिपाली काळे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मा. श्री. विजय कबाडे, पोलीस उप आयुक्त (परीमंडळ), श्रीमती. प्रांजली सोनवणे सहा पोलीस आयुक्त गुन्हे शाखा, श्री अशोक तोरडमल सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग-१, श्री. अजय परमार, विभाग-२, श्री. यशंवत गवारी सहा पोलीस आयुक्त वाहतुक शाखा, तसेच सोलापूर महानगर पालिकेकडील उप-आयुक्त श्री संदिप कारंजे, आर टी ओ संदिप शिंदे, महावितरण अति. कार्यकारी अभियंता श्री. प्रदिप मोरे, इतर प्रशासकीय अधिकारी व तसेच सर्व

पोलीस ठाणे/शाखा प्रभारी अधिकारी व पोलीस अंमलदार व शांतता कमिटीचे सदस्य, पत्रकार बंधु उपस्थित होते.

तरी उपरोक्त प्रमाणे शांतता समिती सदस्य यांचे समवेत घेण्यात आलेल्या बैठकीतील ठळक मुद्यांबाबत आपले लोकप्रिय दैनिकात प्रसिध्दी करुन पोलीस प्रशासनास सहकार्य करावे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel