टेक ऑफनंतर काही क्षणातच विमानाला लागली आग…
नेपाळहून दुबईला जाणार्या विमानाला सोमवारी टेक ऑफनंतर काही क्षणातच पक्षाच्या धडकेने आग लागली. यानंतर क्रू मेंबर्सनी विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती विमानतळाकडून देण्यात आली. काही वेळाने क्रू मेंबर्सनी आग विझल्याचे सांगितले. तसेच यंत्रणाही व्यवस्थित काम करत आहे. त्यानंतर विमान दुबईला परतले. विमानात क्रू मेंबर्ससह 159 प्रवाशी होते.
उड्डाणानंतर काही मिनिटांतच लागली आग
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दुबईचे विमान FZ576 नेपाळच्या काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून रात्री 9:21 वाजता उड्डाण केले. उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमानाला आग लागली. तत्काळ विमानतळाला या प्रकरणाची माहिती देण्यात आली आणि क्रू मेंबर्सनी विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. माहिती मिळताच विमानतळावर अग्निशमन दलाला सतर्क करण्यात आले.
यानंतर क्रू मेंबर्सनी विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र, काही वेळानंतर क्रू मेंबर्सनी विमानाची यंत्रणा व्यवस्थित काम करत असल्याचे विमानतळाला सांगितले. त्यामुळे ते विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करणार नाहीत, असे त्यांनी सांगितले.
इमर्जन्सी लॅंडिंग नाही, नियमित वेळेत येईल विमान
रात्री 11 वाजता, फ्लाय दुबई एअरलाइन्सच्या प्रवक्त्याने रात्री देखील याची पुष्टी केली. त्यांनी सांगितले की, विमानाचे इमर्जन्सी लँडिंग झालेले नाही. फ्लाइट सुरू राहील, ते दुबईला स्थानिक वेळेनुसार 12:14 वाजता पोहोचेल. फ्लाइटमध्ये 50 नेपाळी प्रवाशांचा देखील समावेश होता. तर एकूण 169 लोक होते.