समता सैनिक दलाच्यावतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना…
भगवान गौतम बुद्ध हे महान क्रांतिकारक होते. त्यांनी जागतिक शांतीचा विचार तर मांडलाच परंतु त्यांनी आपल्या संघामध्ये प्रथम महिलांना संधी देऊन क्रांती केली. स्त्री पुरुष समतेचा सिद्धांत पहिल्यांदा त्यांनी मांडला आणि कृतीत आणला. म्हणून भगवान गौतम बुद्ध हे महान क्रांतिकारक होते असे विचार जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे शिक्षण अधिकारी कादर शेख यांनी मांडले. ते समता सैनिक दल, शाक्य संघ आणि सिदनाक ब्रिगेडच्यावतीने आयोजित ६८ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी कार्यक्रमात ध्वजारोहण करतेवेळी बोलत होते. हा सोहळा नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर संपन्न झाला. यावेळी सभामंचकावर निवृत्त पोलीस उप आयुक्त विजय परकाळे,समता सैनिक दलाचे जी ओ सी अंबादास कदम, ज्येष्ठ सल्लागार समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर, शाक्य संघाचे अध्यक्ष अंगद मुके, विजयकुमार कांबळे, आगवणे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
ध्वजारोहण नंतर नॉर्थकोट प्रशाला ते डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा पर्यंत संचलन करण्यात आले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास शिक्षण अधिकारी कादर शेख यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण केल्यानंतर पुतळ्यासमोर मानवंदना देण्यात आली.
यावेळी समता सैनिक दलाच्यावतीने प्रमुख निवृत्त पोलीस उपनिरीक्षक केरु जाधव,अण्णासाहेब भालशंकर ,विजयकुमार कांबळे, बापू गायकवाड, मुकुंद चंदनशिवे, संभाजी तळभांडरे व्ही डी थोरे, वशिष्ठ सोनकांबळे,बापूसाहेब गायकवाड, रत्नदीप कांबळे, प्रमोद जाधव, विनोद जाधव, चंद्रकांत कोळेकर, सुधीर चंदनशिवे, इत्यादी सैनिक उपस्थित होते. तर शाक्य संघाच्यावतीने अध्यक्ष अंगद मुके, व्यंकटेश सोनवणे, शशिकांत बाबरे, कैलास गायकवाड, शांताराम वाघमारे, मिलिंद कोरे, शिवाजी भंडारे इत्यादी उपस्थित होते. सिदनाक ब्रिगेडच्या वतीने शिवपुत्र घटकांबळे,प्रकाश घटकांबळे, जयानंद कांबळे, पांडुरंग चौधरी, भाऊसाहेब वंजारी, मधुकर माने, महिला सैनिकांच्यावतीने सुमित्रा जाधव, सुनीता गायकवाड, सुचित्रा थोरे, प्रेमलता कांबळे, वैशाली उबाळे, इत्यादी महिला सैनिक उपस्थित होते,
ध्वजारोहण समारंभाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन वसिष्ठ सोनकांबळे यांनी केले.