सोलापूर बातमीदेश - विदेशमहाराष्ट्रसोलापूर सामाजिक

लोकमंगलच्या विवाह सोहळ्यात 37 जोडप्यांनी बांधल्या रेशीमगाठी…

मान्यवरांनी दिले वधू वरांना आशीर्वाद...

रविवारी सायंकाळी सूर्य अस्ताला जात असताना…लगीन घाई सुरु… 37 जोडपी कपाळाला बाशिंग बांधून मंचावर आली… आयुष्यभर साथ देण्यासाठी… त्यांच्या रेशीमगाठी बांधल्या लोकमंगल फौंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेला सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात. याचे साक्षीदार होण्यासाठी विविध स्तरातील मान्यवरही आले होते.
माजी सहकार मंत्री तथा आ. सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली 15 डिसेंबर रोजी विजापूर रोडवरील शिवाजी अध्यापक विद्यालय नेहरुनगर (डी. एड. कॉलेजच्या) मैदानावर हजारो मान्यवरांच्या उपस्थिती पार पडला. या विवाह सोहळ्यात 37 वधू-वरांनी रेशीमगाठी बांधल्या. यावेळी आ.सुभाष देशमुख यांनी आगामी काळात दक्षिण तालुक्यातील प्रत्येक गावात विवाह सोहळा करण्याचा मानस व्यक्त केला.
सकाळी सर्व वधू- वरांना समुपदेशन करण्यात आले. वधू- वरांना मान्यवरांच्या हस्ते शालू, सपारी व रुखवत साहित्य देण्यात आले. यावेळी रक्तदान शिबिरही घेण्यात आले. लग्न सोहळ्यात उपस्थित असलेल्या वधूवरांच्या पालक तसेच नातेवाईकांना स्वादिष्ट भोजन देण्यात आले. वधू-वरांची उघड्या बग्गीमधून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी माजी खा. जयसिद्धेश्वर महास्वामी, आ. सुभाष देशमुख, लोकमंगल फाउंडेशनचे अध्यक्ष रोहन देशमुख, मनीष देशमुख, पंचाक्षरी शिवाचार्य महास्वामीजी माळकवठे, अभिनव बसवलींग महास्वामीजी नागणसूर, श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी नागणसूर, सिध्दलींग महाराज शिरवळ, औदुसिद्ध महाराज आरकेरी, राजशेकर स्वामीजी, शांतलिंगेश्वर विरक्त मठ नंदगाव, महांतेश हिरेमठ स्वामीजी तदेवाडी, पसारा शास्त्री हिरेमठ, सोलापूर महासभेचे अमृतेश्वर शिवाचार्य महास्वामी जिंतूर मठ, हरिभक्त परायण भागवत चौरे महाराज, किरण बोधले महाराज,लक्ष्मण चव्हाण महाराज, सुधाकर इंगळे महाराज, ज्योतीराम चांगभले महाराज, संजय पाटील महाराज, विष्णुपंत मोरे महाराज, बळीराम जांभळे महाराज, अभिमन्यू डोंगरे महाराज नाशिककर महाराज, मोहन शेळके महाराज, संजय केसरे महाराज, पंकज गुंड महाराज, पांडुरंग माने महाराज कुमठे आदि संतांची उपस्थिती होती.
चौकट
चौकट
आ. देशमुख यांनी केले कन्यादान
यंदाच्याही या सोहळ्यात आ. सुभाष देशमुख आणि त्यांच्या पत्नी स्मिता देशमुख यांनी प्रथेप्रमाणे वधू-वरांना विवाहाचे कपडे, हळदीच्या कपड्यांसह ताट-वाटी, ग्लास प्रत्येकी 5 नग, बालकृष्णाची मूर्ती, स्टीलचा हंडा, स्टीलचा डबा, तांब्या असे संसारोपयोगी साहित्य देऊन कन्यादान केले.
चौकट
लोकमंगलच्या सामुदायिक विवाह सोहळ्याने व्यापक स्वरूप घेतले आहे. आता आगामी काळात दक्षिण तालुक्यातील प्रत्येक गावात विवाह सोहळा करण्याचा मानस आहे. एका गावात जर पाच जोडप्यांचे विवाह जमले असतील तर संबंधित गावच्या सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी लोकमंगल फोंडेशनशी संपर्क साधावा. गावभोजनासहित गावातच विवाहसोहळा करण्यात येईल.
सुभाष देशमुख, आमदार

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel