छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड तर्फे भव्य रॅली

छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड च्या वतीने संस्थापक अध्यक्ष फारुख भाई शेख यांच्या नेतृत्वाखाली शिवजयंती निमित्त भव्य रॅली काढण्यात आली! छत्रपती शिवाजी महाराज उद्यान रंगभवन परिसर येथील पुतळ्यास अभिवादन करून ही रॅली ची सुरुवात करण्यात आली! बेगम पेठ, विजापूर वेस, राणी लक्ष्मीबाई भाजी मंडई ,दत्त चौक, नवी पेठ मार्गे जाऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आला! सदरील रॅलीत युवक वर्ग हा मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता,छत्रपती शिवाजी महाराज की जय, हम सब एक है असे जोरदार घोषणा देऊन सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला! यावेळी बोलताना संस्थापक अध्यक्ष फारुख भाई शेख यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासावर प्रकाश टाकत राजे सर्व जाती धर्माला घेऊन राज्य करत होते, त्यांच्या राज्यात अनेक मुस्लिम सैनिक होते असे मनोगत व्यक्त केले! यावेळी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च रुग्णालयाचे अधिष्ठता सुधीर देशमुख,
संत रोहिदास सामाजिक संस्थेचे अशोक अंगावणे, एडवोकेट सिराज शेख, शेरू कुरेशी,युवा नेते सरफराज शेख, इमाम लालखा सर,भालशंकर सर,कीर्तिपाल गायकवाड,मिलिंद प्रकशाले, युवक शहर अध्यक्ष अयाज दिना (मेंबर) शेख,अब्दुल्ला डोणगावकर,एडवोकेट इस्माईल शेख,एजाज शेख,इलियास शेख, गौस पीरजादे, सलीम शेख,मोहम्मद शेख,युनूस मुर्शद, श्रीकांत गायकवाड, फारूक हवालदार, महिबूब लाल्खा,सौरभ भांड, इम्रान शेख,अब्बास बागवान, अरबाज बागवान, आधी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते!