राजकीय

अजित पवारांनी संजय राऊतांना सुनावले…

आमच्या पक्षाचे वकीलपत्र घेण्याची काहीही आवश्यकता नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वत:चे प्रवक्त आहेत, नेते आहेत. ते पक्षाची भूमिका मांडतील, अशा शब्दांत अजित पवार यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना सुनावले आहे.

संजय राऊत काय म्हणाले होते?

ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनातील रोखठोक सदरात संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीवर सूचक वक्तव्य केले होते. उद्धव ठाकरे व शरद पवारांच्या भेटीचा उल्लेख करत या लेखात संजय राऊतांनी म्हटले होते की, राष्ट्रवादीतून कुणाला भाजपमध्ये जायचे असल्यात त्याची ती वैयक्तिक भूमिका असेल. पण पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाणार नाही.

संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतरच अजित पवारांभोवती पुन्हा संशयाची धुके निर्माण झाली होती. राज्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार मुख्यमंत्रीपदासाठी भाजपसोबत सत्तेत सहभागी होऊ शकतात, अशा चर्चांना ऊत आला होता.

आमच्याकडे प्रवक्ते आहेत ना

आज पत्रकार परिषदेत या चर्चांचे खंडन करताना अजित पवार म्हणाले की, माझ्याबाबत आणि माझ्या सहकाऱ्यांबाबत मुद्दामहून गैरसमज पसरवले जात आहेत. एका पक्षाच्या मुखपत्रातूनही माझ्या बंडावर काहीही चर्चा केली गेली. तुम्हाला आमचे वकीलपत्र घेण्याची काय आवश्यकता आहे. आमची बाजू मांडण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. आमच्या पक्षात ज्येष्ठ नेते, प्रवक्ते आहेत ना. ते आमची भूमिका मांडतील. उगीच काहीतरी बोलून संभ्रम का निर्माण करत आहात.

संजय शिरसाटांनाही खडेबोल

अजित पवार यांनी आजच्या पत्रकार परिषदेत शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनाही खडेबोल सुनावले. अजित पवार यांच्या बंडाबाबत संजय शिरसाट म्हणाले होते की, अजित पवांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून आमच्यासोबत यावे. अन्यथा आम्ही सत्तेतून बाहेर पडू. संजय शिरसाट यांच्या या वक्तव्यावरही अजित पवारांनी चांगलाच संताप व्यक्त केला.

माझ्यावर एवढे प्रेम का?

अजित पवार म्हणाले, अरे मी अजून कुठे गेलेलो नाही. कुठे आलेलो नाही. त्याआधीच ते आले तर आम्ही जाऊ, अशी भाषा का करत आहात? माझी काही भूमिका असेल तर मी ती स्वत: मांडेन ना. मी स्वत: पत्रकार परिषदेत माझी भूमिका मांडेल. त्याआधीच माझ्या येण्यावर येवढी काय चर्चा करताय. काही लोकांचे माझ्यावर एवढे काय प्रेम आहे, हेच मला समजेनासे झाले आहे.

संजय शिरसाटांची कोलांटऊडी

दरम्यान, अजित पवार यांनी खडेबोल सुनावल्यानंतर संजय शिरसाट यांनीही आपल्या वक्तव्यावरून कोलांटउडी मारली. मी ‘जर’ अजित पवार भाजपसोबत आले तर, असे म्हणालो होतो. मी जर-तरची भाषा केली होती, असे संजय शिरसाट म्हणाले आहेत.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel