राजकीय

अजित पवार घोटाळेबाज, वेगवेगळ्या गुन्ह्यांत अडकलेले नेते – शालिनीताई पाटील

अजित पवार घोटाळेबाज आणि वेगवेगळ्या गुन्ह्यांत अडकलेले नेते आहेत. त्यांना कधीही अटक होऊ शकते. त्यामुळे त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद देणे चुकीचे ठरेल, असा दावा महाराष्ट्राचे माजी दिवंगत मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी माजी मंत्री शालिनीताई पाटील यांनी अजित पवार यांच्यावर हल्लाबोल करताना केला आहे.

63 वर्षे संसदीय राजकारणात ‘अजिंक्य’ राहिलेले 83 वर्षीय माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी मंगळवारी राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली. राष्ट्रवादीचे अध्यक्षपदही सोडणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच नवा अध्यक्ष निवडीसाठी त्यांनी समितीही जाहीर केली. ‘लोक माझे सांगती’ या आत्मचरित्राच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन कार्यक्रमात पवारांनी ही घोषणा करताच सर्वांना धक्काच बसला.

अजितदादा कि सुप्रियाताई?

शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर एकच हल्लाकल्लोळ माजला. मात्र शरद पवार अजूनही आपल्या निर्णयावर ठाम आहेत. शरद पवारांनंतर कोण असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. अजितदादा कि सुप्रियाताई? राजकीय क्षेत्रातून यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. आता माजी मंत्री शालिनीताई पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत कलहावर बोट ठेवले आहे. अजित पवार कसे अक्ष्यक्ष होण्यास सक्षम नाहीत याबाबत त्यांनी अजित पवारांचे नाव घेत थेट टीका केली आहे. शरद पवार यांच्या कट्टर राजकीय विराेधक म्हणून माजी मंत्री शालिनीताई पाटील या ओळखल्या जातात.

मी आज 90 वर्षांची

शालिनीताई पाटील एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाल्या, शरद पवारांच्या आमदारांचे म्हणणे आहे की असे अचानक निघून जाणे चुकीचे आहे. योग्य पर्याय जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत शरद पवारांनी निवृत्ती घेऊ नये. हा निर्णय त्यांनी घाईत घेतला आहे. मी आज 90 वर्षांची आहे. तरी लोक मला निवृत्ती घेऊ देत नाही. शरद पवार तर माझ्यापेक्षा 10 वर्षांनी लहान आहेत, असे म्हणत शालिनीताईंनी शरद पवारांना ज्येष्ठतेचा सल्ला दिला.

1400 कोटींचे मनी लॉड्रिंग

शालिनीताई पाटील पुढे बोलताना म्हणाल्या, अजित पवार यांना अध्यक्षपद देण्यात येऊ नये. जरंडेश्वर कारखान्यात अजित पवार यांनी 1400 कोटींचे मनी लॉड्रिंग केले आहे. मला हा प्रश्न पडला आहे, हसन मुश्रीफ यांच्यावर 100 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप आहे. यांची ईडीने चौकशी केली मात्र अजूनपर्यंत अजित पवारांना का बोलावले नाही? कारण अजित पवारांवर भाजपच्या मोठ्या नेत्याचा हात आहे. त्यामुळे अद्याप त्यांची चौकशी झालेली नाही. त्यामुळे अध्यक्षपद हे सुप्रिया सुळेंनाच द्यायला हवे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel