राजकीयसोलापूर बातमीसोलापूर राजकीयसोलापूर सामाजिक

अरे बांडगुळानो तुम्ही कधी बिरोबाच्या पाया पडला का? तुम्ही जातीत जातीत भांडण लावताय…

वयाच्या 22 व्या वर्षांपासून सफारी मध्ये फिरतोय;त्यावेळी तुम्हाला चड्ड्या घालता येत नव्हत्या

राष्ट्रवादीच्या सुरज चव्हाणांना गोपीचंद पडळकरांचे बाणेदार उत्तर

सोलापूर:भाजप आमदार गोपीचंद पडळकर गुरुवारी दुपारी शासकीय विश्रांमगृहात माध्यमांशी संवाद साधला.वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून संभाजी ब्रिगेड आणि गोपीचंद पडळकर हे एकमेकांवर संतप्त टीका करत आहे.संभाजी ब्रिगेडच्या सकाळच्या टिकेनंतर दुपारी गोपीचंद पडळकर यांनी प्रतिउत्तर दिले आहे.संभाजी ब्रिगेडच्या बांडगुळानो तुम्ही कधी बिरोबाच्या पाया पडलाय का?तुमचा अजेंडा काय आहे,तुमच्या संघटनेचा अजेंडा काय हे पाच मिनिटं महाराष्ट्र राज्याला सांगा .जातीजाती भांडण लावणं,समाजात तेढ निर्माण करणं,याच्या पलीकडे संभाजी ब्रिगेडने केले काय असा सवाल भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला आहे.संभाजी महाराजांच्या नावाने संघटना चालवताय,आणि औरंगजेबाची कबरीबाबत बोलताना आमचा काही आक्षेप नाही असे सांगता,तुम्हाला लाजा वाटयाला पाहिहे अशी प्रतिक्रिया देत गोपीचंद पडळकर यांनी संभाजी ब्रिगेडचा खरपूस समाचार घेतला.

*काय म्हणाले संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी-
भाजप आमदार गोपीचंद पडळकर हा लाचार माणूस आहे, अशी टीका संभाजी ब्रिगेडच्या संतोष शिंदे यांनी केली होती. जो माणूस बिरोबाचा झाला नाही, तो धनगर समाजाचा काय होणार? असा पलटवार संभाजी ब्रिगेडच्या संतोष शिंदे यांनी केला आहे. गोपीचंद पडळकर यांनी संभाजी ब्रिगेडवर जोरदार टीका केली होती. वाघ्या कुत्र्याचा विषय ब्रिगेडींनी काढला असं पडळकर म्हणाले होते.सोलापुरात असताना गोपीचंद पडळकर यांनी संभाजी ब्रिगेडवर तोफ डागली.

*तुम्हाला चड्ड्या घालता येत नव्हत्या त्यावेळी मी सफारी मधून फिरत होतो-
राष्ट्रवादीचे सुरज चव्हाण यांनी एक्स वरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांवर टीका केली होती.त्याबाबत पडळकर यांनी सोलापुरातूंच सूरज चव्हाणांना बाणेदार उत्तर दिले आहे.माझ्यावर मंगळसूत्र चोरीचा खोटा गुन्हा दाखल केला होता.यांना चड्ड्या देखील घालता येत नव्हत्या त्यावेळी मी सफारी गाडी मध्ये फिरत होतो.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel
Account Suspended
Account Suspended
This Account has been suspended.
Contact your hosting provider for more information.