सोलापूर बातमीsolapur mim newsमहाराष्ट्रराजकीयसोलापूर महानगरपालिकासोलापूर राजकीय

अरेरे ! गाझी, फिरदौस यांच्याशी आमचा संबंध नाही ! एमआयएम गटनेत्यांनी थेटच सांगितले…

सोलापूर महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांची निवड प्रक्रिया शुक्रवारी 20 फेब्रुवारी रोजी सर्वसाधारण सभेत होणार आहे. भारतीय जनता पार्टीचे नऊ सदस्य निश्चित झाले आहेत मात्र एकमेव एम आय एम पक्षाचा सदस्य कोण असणार याकडे सर्वांच्या नजरा होत्या.

माजी नगरसेवक तोफिक शेख यांच्या पण नावाची चर्चा झाली. परंतु स्वीकृत नगरसेवक पदासाठी महानगरपालिकेमध्ये अर्ज दाखल करण्यात आले. त्यामध्ये माजी नगरसेवक गाजी जहागीरदार व माजी नगरसेविका फिरदोस पटेल यांनी पण आपले अर्ज दाखल केले आहेत. एमआयएम पक्षाच्या वतीने दुसऱ्याच कार्यकर्त्याच्या नावाचा अर्ज दाखल झाला आहे.

दरम्यान माध्यमांनी एमआयएम पक्षाच्या गटनेत्या वाहिदा भंडाले यांच्याशी महापालिकेत संवाद साधला असता त्यांनी माजी नगरसेवक गाझी जहागीरदार आणि फिरदोस पटेल यांनी अर्ज दाखल केले असले तरी आमचा त्यांच्याशी काही संबंध नाही असे थेट सांगून त्या दोघांचे महत्त्व कमी केले.

दरम्यान एमआयएम पक्षाकडून नईम सालार यांचा अधिकृतपणे पक्षाच्या वतीने अर्ज भरल्याचे यावेळी सांगण्यात आले. पण सालार यांचे नाव कसे आले हे मात्र अजूनही गुलदस्तक आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel