सोलापूर बातमीमहाराष्ट्रशैक्षणिक

अलफीया पठाणला एमआयएमच्या फारूक शाब्दीची मदत;भविष्यात देखील मदतीचे आश्वासन

झोपडपट्टीत राहणारी विद्यार्थीनी अलफीयाचा एमआयएमकडून कौतुक

सोलापूर:सोलापुरात राहणाऱ्या अलफीया पठाण या विद्यार्थीनीने नीट परीक्षेत उत्तुंग झेप घेतली आहे.विजापूर नाका परिसरात असलेल्या दोन नं झोपडपट्टीत राहणाऱ्या अलफीया पठाणचे यश पाहून सर्वस्तरातून कौतुक होत आहे.सोलापूर जिल्हा आणि शहराचे एमआयएम प्रमुख हाजी फारूक शाब्दी यांनी बुधवारी सायंकाळी अलफीया पठाण याच्या घरी जाऊन पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे.मुस्लिम समाजातील मुलींनी उच्च शिक्षण घ्यावे,त्यासाठी समाजातर्फे आणि एमआयएम तर्फे सर्वतोपरी मदत करण्यासाठी कटिबद्ध असल्याची माहिती एमआयएम नेते फारूक शाब्दी यांनी सांगितली.

अलफिया पठाण याचे वडील भाजी विक्रीचा व्यवसाय करतात ,तर आई कपड्याच्या दुकानात रोजंदारीवर काम करते.भाड्याच्या एकाच खोलीत पठाण कुटुंबीय राहत आहे.अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अलफीया पठाण हिने नीट परीक्षेत 720 गुणांपैकी 617 गुण प्राप्त केले आहे.मुस्लिम समाजातील अलफीया पठाण एकमेव विद्यार्थीनी आहे, नीट परीक्षेत इतक्या उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाली आहे.देशभरातील अनेक पालक लाखो रुपये खर्च करून आपल्या पाल्याना खाजगी शिकवणी लावून वैद्यकीय क्षेत्रात प्रवेशासाठी धडपड करत असतात.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएससाठी प्रवेश घ्यावयाचा असल्यास ,नीट ही स्पर्धा परीक्षा मेरिट मध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक असते.अलफिया पठाणने नीट परीक्षा पहिल्याच प्रयत्नांत मेरिट मध्ये उत्तीर्ण केली आहे.सर्व समाजातील गोरगरीब ,कष्टकऱ्यासाठी झटणारे एमआयएम नेते फारूक शाब्दी यांनी पुन्हा एकदा मदतीचा हात देत आधार दिला आहे.
एमआयएमच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी हाजी फारूक शाब्दी यांच्या सोबत अलफीया पठाणच्या घरी जाऊन तिच्या आईवडिलांचा सत्कार केला.अलफिया पठाणला रोख स्वरूपात पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत केली.भविष्यात काही मदतीची गरज वाटल्यास एमआयएम सदैव तुमच्या सोबत आहे असे आश्वासन दिले.यावेळी जुबेर शेख,जुबेर सय्यद, इलियास शेख, नासिर मंगलगीरी, एजाज बागवान, राजा बागवान,नदीम डोंनगावकर,मोहसिन मैंदर्गीकर,शोहेब चौधरी आदी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login