सोलापूर बातमीSolapur court matterन्यायालय निर्णय

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास ३ महिने कारावासाची शिक्षा…

सोलापूर : एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करून तिचा विनयभंग करणाऱ्यास जिल्हा व सत्र न्यायाधीश जयदीप मोहिते यांनी ३ महिने कारावास व २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

आसीफ मलंग मुजावर (रा. शास्त्री नगर, सोलापूर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत पिडीतेच्या फिर्यादीवरुन वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यातील पिडीतेचा आसीफ मुजावर याने एकतर्फी प्रेमातून वारंवार तिचा पाठलाग करून तिचा हात धरून ओढून तिच्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला होता. त्यामुळे याबाबत वळसंग पोलीस ठाण्यात पोक्सो व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हयात आसिफ मुजाबर यास अटक करून पोलीसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र पाठिवले होते.
त्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश मोहिते यांच्यासमोर झाली. सरकारी पक्षाने केलेला युक्तीवाद, पिडीतेची साक्ष व पुरावा ग्राढ्य धरून न्यायाधीश मोहिते यांनी आरोपी मुजावर यास विविध कलमाखाली ३ महिने कारावास व २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

याप्रकरणी सरकारच्यावतीने अॅड. शीतल डोके, अॅड. कविता बागल यांनी तर आरोपीच्यावतीने अॅड. कदेर आवटी यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी म्हणून पोलीस शिपाई कोळी यांनी काम पाहिले.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel