अल-फज्र हज अँड उमरा टूर्सचे लोकार्पण उद्या मान्यवरांच्या हस्ते होणार..!

सोलापूर शहर व जिल्ह्यासाठी एक आनंदाची बातमी समोर येत असून अल-फज्र हज अँड उमरा टूर्स चे लोकार्पण सोलापूर शहर जिल्ह्यातील दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे मुस्लिम समाज बांधवांचे पवित्र स्थान म्हणजे मक्का आणि मदिना हे होय.. दरम्यान अल-फज्र हज अँड उमरा टूर्स ची सुरुवात आसिफ इकबाल नजीर सय्यद, शहानवाज सय्यद, रिजवान रियाज हुंडेकरी, व तसेच हाजी जुबेर आयुब शेख यांच्यावतीने करण्यात आले असून मुस्लिम समाज बांधवांसाठी अगदी सोयीस्कर व कमीतकमी खर्चामध्ये तसेच मध्यमवर्गीय व गरीब तळागळातील प्रत्येक मुस्लिम व्यक्तीचे हज व उमरा व्हावे या हेतूने याची सुरुवात करण्यात आल्याची माहिती अल-फज्र हज अँड उमरा टूर्स च्या वतीने देण्यात आले आहे” दरम्यान याचेच लोकार्पण सोहळा येत्या सोमवारी सात सप्टेंबर 2026 रोजी मोठ्या थाटामाटात संपन्न होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे



