सोलापूर बातमीमहाराष्ट्रराजकीयसोलापूर महानगरपालिकासोलापूर राजकीय

ईच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं सोलापूरच्या विकासाच्या शिलेदारांचा सन्मान

ईच्छा भगवंताची परिवाराच्या वतीने भाजपा नगरसेवक किसन जाधव यांच्या सात रस्ता परिसरातील सोनामाता प्रशाला समोरील संपर्क कार्यालयात नूतन स्वीकृत नगरसेवक तसेच स्थायी समिती सदस्यांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. शाल, भगवा फेटा, वृक्ष आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवन चरित्रावरील पुस्तक भेट देऊन मान्यवरांचा गौरव करण्यात आला या कार्यक्रमास महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्यासह माजी महिला व बालकल्याण समिती सभापती, अश्विनी चव्हाण, संगीता जाधव, स्वीकृत नगरसेविका वृषाली चालुक्य, देवकर मावशी, बिजू प्रधाने, सत्यनारायण गुर्रम, विजय चिप्पा, शिवाजी वाघमोडे, सतीश शिरसिल्ला, भरतसिंग बडूरवाले, अक्षय अंजिखाने, श्रीनिवास दायमा, ज्ञानेश्वर म्याकल, अँड. ऋषिकेश मेट्रे, रुद्रेश बोरामणी, विठ्ठल मेट्रे आदी उपस्थित होते. यावेळी किसन जाधव, नगरसेवक दत्तात्रय नडगिरी, माजी परिवहन समिती सदस्य संतोष कदम, युवा नेते चेतन नागेश आण्णा गायकवाड, महेश देवकर, वृक्षमित्र मनोज देवकर, निलेश कांबळे, अरविंद शेरखाने, संतोष गायकवाड (हुडको), अमोल जगताप, रामभाऊ मिस्त्री, किरण शिंदे, हुलगप्पा शासम, उत्कर्ष गायकवाड, यल्लाप्पा शिवापुरी, प्रथमेश पवार, ऋषी येवले, बिराजदार मावशी, शोभा गायकवाड, मारता असादे, प्रमिला स्वामी, शहाजान शेख, फिरोज पठाण आदींची उपस्थिती लक्षणीय ठरली. सत्कारास उत्तर देताना महापौर विनायक कोंड्याल यांनी सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व घटकांना सोबत घेऊन पारदर्शक व विकासाभिमुख काम करू, अशी ग्वाही दिली. शहरातील मूलभूत सुविधा, स्वच्छता, पायाभूत विकास आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर प्राधान्याने लक्ष केंद्रित केले जाईल, असे मनोगत उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी व्यक्त केले यावेळी उपस्थित नूतन सदस्यांना किसन जाधव यांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमामुळे सोलापूरच्या विकासाच्या शिलेदारांना एकत्र आणण्याचा संदेश देत शहरात सकारात्मक राजकीय वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login