सोलापूर बातमी

नालंदा बुद्ध विहार तरुण मंडळ आयोजित विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण संपन्न…

सोलापूर दि. नालंदा बुद्ध विहार मंडळाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त आयोजित विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर हे होते तर कार्यक्रमाला जयद्रथ खंडागळे, सिद्राम बेरे, बँक अधिकारी अरविंद साबळे ,उमेश शिंदे, अनिल बनसोडे ,बुद्धजय भालशंकर, शीला हावळे , महावितरणच्या सावंत मॅडम इत्यादींची उपस्थिती होती. मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, धावणे स्पर्धा महिलांच्यासाठी रांगोळी स्पर्धा ,मुलांच्यासाठी क्रिकेट स्पर्धा ,संगीत खुर्ची स्पर्धा, गीत गायन स्पर्धा, डान्स स्पर्धा, वन मिनिट्स शो स्पर्धा, नाटिका सादरीकरण स्पर्धा इत्यादी स्पर्धांचे समावेश होता ,या स्पर्धेमध्ये नालंदा नगर, गणेश नगर ,सिटीजन पार्क,आदित्य नगर, जाई जुईनगर, विद्यानगरी इत्यादी नगरातील विद्यार्थी, पुरुष आणि महिलांचा समावेश होता. या स्पर्धेमध्ये बहुसंख्य स्पर्धक उत्साही वातावरणामध्ये सहभागी झाले होते .यशस्वी स्पर्धकांना मेडल आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरती विविध गीते सादर करण्यात आली .कुमारी ज्योती खंडागळे हिने सादर केलेल्या बाबासाहेब आंबेडकरांवरील गीतास आणि समूह नृत्यास प्रथम क्रमांक मिळाला. तसेच पंचशीलाचे महत्व या लघु नाटिकेस प्रथम क्रमांक मिळाला .चि. निर्वी भालशंकर( मुंबई )हिने सादर केलेल्या फॅन्सी ड्रेस शो मध्ये रमाईची भूमिका उठून दिसत होती .तिने सादर केलेले नृत्य प्रथम क्रमांकाचे ठरले.
या बक्षीस वितरण समारंभाचे प्रास्ताविक अश्वजित दुपारगुडे यांनी केले ,सूत्रसंचालन मिलिंद भालशंकर यांनी केले तर शीला हावळे यांनी सर्वांचे आभार मानले. आठ दिवस संपन्न झालेल्या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अश्वजीत दुपारगुडे, मिलिंद भालशंकर, चारुशीला भालशंकर ,प्रकाश शिंदे, मुख्याध्यापिका मंजुश्री खंडागळे, शीला हावळे इत्यादींनी परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel