एमआयएम नेत्याच मोठा गौप्यस्फोट

उत्तर सोलापूर मतदार संघात आमदार इलेक्शन लढा म्हणून मला एमआयएम मधील नेत्यांनी पैसे आणून दिले
फारूक शाब्दीच काय संबंध मी तर प्रदेशाध्यक्षकडे एबी फॉर्मसाठी रीतसर अर्ज केला होता
एमआयएमचे माजी युवक अध्यक्ष मोहसीन मैनदर्गीकर यांनी एका कार्यक्रमात मोठा गौप्यस्फोट केला आहे.ईद ए मिलाद निमित्त सोलापूर शहरातील किडवाई चौक येथील एका मंगल कार्यालयात सर्वच समाजातील राजकिय व सामाजीक नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची मिटिंग आयोजित केली होती.मिटिंग मध्ये एमआयएमचे माजी पदाधिकारी मोहसीन मैनदर्गीकर यांनी विधानसभा निवडणुकीत झालेल्या घडामोडीवर प्रकाश टाकला.मोहसीन मैनदर्गीकर यांनी सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली होती.भाषण करताना मोहसीन यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.एमआयएम पक्षाकडे उमेदवारी मिळावी म्हणून मी रीतसर अर्ज केला होता.प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्याकडे पाठपुरावा सुरू होता.ऐनवेळी माझा तिकीट कापण्यात आलं होतं,परंतु एमआयएममधील काही नेते माझ्या कडे आले,आणि निवडणुकीतून माघारी घेऊ नका असं सांगितलं आणि मला पैसे आणून दिले होते असं सांगितलं.त्यामुळे पक्षातील गद्दार कोण आहे ,असा सवाल उपस्थित केला जात आहे.



