राजकीय

करमाळा,‎ सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघांसह, महापालिका,‎‎ जिल्हा परिषद निवडणुका‎ लढवणार

जिल्ह्यातील करमाळा आणि‎ सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघांसह, महापालिका आणि ‎ ‎ जि.प. परिषद निवडणुका‎ लढवण्याचा निर्धार प्रहार जनशक्ती पक्षाने केल्याची माहिती, पक्षाचे‎ उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल‎ चौधरी यांनी रविवारी (दि. ४)‎ पत्रकार परिषदेत दिली.

चौधरी‎ सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या‎ दौऱ्यावर आहेत. दोन दिवसांत त्यांनी ‎सोलापुरातील मतदारसंघ, स्थानिक ‎ ‎ स्वराज्य संस्थांच्या सद्यस्थितीचा ‎‎ निवडणुकीच्या अंगाने आढावा‎ घेतला.‎ शासकीय विश्रामगृह येथे‎ झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ‎राज्यातील १५ विधासनभा, दोन‎ लोकसभा निवडणुका लढवण्याची‎ घोषणा केली.‎

खडसेंकडे अपंगत्वाचे‎ बनावट प्रमाणपत्र‎

चौधरी म्हणाले, माजी मंत्री एकनाथ‎ खडसे यांच्याकडे दिव्यांगत्वाचे‎ बनावट प्रमाणपत्र आहे. आमदार‎ बच्चू कडू यांच्याकडे दिव्यांग‎ महामंडळाची जबाबदारी येत आहे.‎ पहिली चौकशी खडसेंची होईल.‎

मंत्र्यांची विमाने येतात,‎ प्रवासी सेवाच का नाही‎

शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी‎ शेतकऱ्यांसाठी चिमणी बचाव‎ आंदोलनात सहभागी होऊ, असे‎ सांगितले. मुख्यमंत्री आणि इतर‎ मंत्र्याची विमाने येतात, मग छोट्या‎ प्रवासी विमानसेवेला कसली‎ अडचण, असा सवाल केला. जल‎ जीवन मिशनच्या कामांमध्ये‎ अनियमितता झाल्याबाबत आंदोलन‎ करणार असल्याचे सांगण्यात आले.‎

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel