सोलापूर बातमीमहाराष्ट्रशैक्षणिक

कर्मयोगी आप्पासाहेब काडादी चित्रकला महाविद्यालय यांच्या वतीने राज्यस्तरीय भव्य निसर्ग चित्र स्पर्धेचे आयोजन

पन्नास हजार रुपयाची पारितोषिके

सोलापुरातील नामांकित कर्मयोगी अप्पासाहेब काडादी चित्रकला महाविद्यालयाच्या वतीने रविवार दि 9 फेब्रुवारी 2025 रोजी राज्यस्तरीय भव्य निसर्ग चित्रण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कला महाविद्यालयास यंदा पंचविसावे वर्ष पूर्ण होत आहे याचे औचित्य साधून महाराष्ट्रातील कलावंतांसाठी खुल्या निसर्ग चित्रण स्पर्धा चे आयोजन करण्यात आलेले आहे. संस्थेचे सचिव मा धर्मराज काडादी यांनी महाराष्ट्रातील सर्व कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन केले आहे.
महाराष्ट्रातील विविध कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी सोलापुरातील प्रेक्षणीय स्थळांचे चित्रण हा विषय ठेवण्यात आलेला आहे . सदर स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी सकाळी साधारणपणे नऊ वाजता श्री संगमेश्वर महाविद्यालय आवार येथील कर्मयोगी अप्पासाहेब काडादी चित्रकला महाविद्यालय येथे सकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत नावे नोंदवून सोलापुर शहरातील कोणत्याही परिसरातील एखाद्या ठिकाणाचे चित्र रेखाटून रंगवून पूर्ण करून सायंकाळी 4 वाजेपर्यंत आणून द्यायचे आहे अशी सूचना महाविद्यालयाचे प्राचार्य सचिन गायकवाड यांनी केले आहे. या स्पर्धेत भव्य पन्नास हजार रुपयाची एकत्रित प्रत्येकी पाच हजार रूपयांची दहा पारितोषिके देण्यात येणार आहेत.
टॉप टेन बक्षिसे देण्यात येणार असून यासाठी मा. श्री भगवान रामपुरे शिल्पकार , मा. श्री दत्ताअण्णा सुरवसे उद्योगपती , मा. डॉ . उमा प्रधान नेत्र विशारद , श्री वैभव इंगळे आर्किटेक्ट , श्री सुनील धोत्रे संस्थापक लोकसेवा हायस्कूल , मयूर बाकळे मॉडर्न स्टेशनरी , श्री रामचंद्र हक्के निवृत्त कलाशिक्षक , श्री नितीन खिलारे चित्रकार , श्री. देवीदास बडूरवाले लोधेश्वर पेंटिंग कंपनी ,श्री प्रसाद चोळचगुड्ड , लोटस एजन्सी , श्री गोपी मीठ्ठा मीनाक्षी ज्वेलर्स , श्री विशाल सुर्डी व्हिफ्रेश एअर फ्रेशनर ,श्रीमती सुमित्रा नागरतन इचगे यांच्या सहयोगाने पारितोषिके देण्यात येणार आहेत.
सदर स्पर्धेचे पारितोषिक वितरण त्याच दिवशी म्हणजे 9 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता प्रमुख पाहुण्यांच्या मान्यवरांच्या उपस्थितीत कर्मयोगी अप्पासाहेब काडादी चित्रकला महाविद्यालय , संगमेश्वर महाविद्यालय आवार येथे पार पडणार असून सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी चित्रे देऊन उपस्थित रहायचे आहे.

महाविद्यालयाच्या वतीने माहिती पत्रक देण्यात आलेले असून स्पर्धेत सहभागी होण्यासाठी माहिती पत्रक वर दिलेले स्कॅनर स्कॅन करून पण नांव नोंदणी करून विद्यार्थी, हौशी चित्रकार, चित्रकार कोणीही या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्रा . मिनाक्षी रामपुरे, प्रा. देवेंद्र निंबर्गीकर, प्रा. मल्लिकार्जुन सालीमठ, प्रा. आशिष माशाळे , लिपिक श्रीपती गोटे, शिक्षकेतर कर्मचारी मठपती आदी परिश्रम घेत आहेत

 

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login