“कसबा गणपती मंडळाचा हा गौरव माझ्यासाठी अत्यंत आनंददायी आहे आणि जनतेच्या सेवेत अधिक प्रेरणा देणारा आहे.” – महापौर विनायक कोंड्याल

बाळीवेस येथील श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळा तर्फे नूतन सोलापूरचे महापौर विनायक कोंड्याल उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर सोलापूर महानगरपालिका स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते नगरसेविका बबिताताई धुम्मा व स्विकृत नगरसेवक रुद्रेश बोरामणी या सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते श्रीमंत मानाचा कसबा गणपती पुजा, आरती करून या सर्व मान्यवरांचा सत्कार कसबा गणपती मंडळाचे उत्सव अध्यक्ष बाळासाहेब मुस्तारे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी त्यांना पुष्पगुच्छ, शाल, हार आणि कसबा गणपतीची प्रतिमा देऊन गौरविण्यात आले.
या प्रसंगी मंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष सोमनाथ भोगडे, मल्लिनाथ खुने, संजय दर्गोपाटील, केदार मेंगाणे, मल्लिनाथ मसरे, गुरुलिंग समाणे, रामचंद्र जोशी, बिप्पीन धुम्मा, बाळासाहेब भोगडे, विकास धुम्मा, सोमनाथ मेंगाणे, चिदानंद मुस्तारे, नागनाथ मेंगाणे, पुष्कराज मेत्री, गुरुशांत मोकाशी, आनंद मुस्तारे, जगदीश हिरेहब्बू, लक्ष्मण भाईकट्टी, गुरु पटणे, संजय बिराजदार, राजू उटगे तसेच महिलामध्ये विध्याताई जोडभावी, विजयालक्ष्मी मुस्तारे, रुपाली कुताटे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
सोलापूर हे केवळ एक शहर नसून संस्कृती, परंपरा आणि सामाजिक एकतेचे प्रतीक आहे. या शहराच्या विकासासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी मला महापौर म्हणून काम करण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य आहे.
कसबा गणपती मंडळ हे केवळ धार्मिक कार्यात मर्यादित न राहता सामाजिक उपक्रम, आरोग्य शिबिरे, शैक्षणिक मदत आणि आपत्तीच्या काळात मदतीचा हात पुढे करणारे एक आदर्श मंडळ आहे. अशा मंडळाकडून मिळालेला सन्मान माझी जबाबदारी अधिक वाढवणारा आहे.
सोलापूर शहराचा महापौर म्हणून माझा कसबा गणपती मंडळ तर्फे होत असलेला हा सत्कार माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा आणि भावनिक क्षण आहे. या सन्मानाबद्दल मी मंडळाचे ट्रस्टी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्व गणेशभक्तांचे मनःपूर्वक आभार मानतो.
कसबा गणपती मंडळ हे केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक कार्यातही अग्रेसर असलेले मंडळ आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजजागृती, शैक्षणिक उपक्रम, रक्तदान शिबिरे, पर्यावरण संरक्षण अशा अनेक विधायक कार्यांमुळे मंडळाने शहरात वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपत्तीच्या काळात मदतीचा हात पुढे करणारे एक आदर्श मंडळ आहे. अशा प्रतिष्ठित मंडळाकडून होत असलेला सत्कार ही माझ्यासाठी मोठी प्रेरणा आहे.
श्री कसबा गणपतीच्या कृपेने आणि आपल्या सर्वांच्या पाठिंब्याने आपण सोलापूर शहराला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाऊ, असा मला पूर्ण विश्वास आहे असे मनोगत कोंड्याल यांनी व्यक्त केली.
कसबा गणपती मंडळाने केलेल्या या सन्मानाबद्दल मी मनःपूर्वक आभार व्यक्त करते. हा सन्मान मला सोलापूर शहरासाठी अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा देतो, अशी ग्वाही देवकर यांनी व्यक्त केली.
स्थायी समिती सभापती रंजिता चकोते यांनी सत्कार प्रसंगी बोलताना “सर्वांसाठी समाजकल्याण आणि नगरसेवेत काम करण्याचा माझा प्रयत्न असेल. कसबा गणपती मंडळासारख्या समाजसेवी मंडळासोबत काम करताना नेहमीच आनंद होतो. हा सत्कार मला आणखी प्रोत्साहन देणारा ठरला.”
श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळाचा सत्कार मला पुढील सेवेत अधिक प्रेरणा देतो. जनतेच्या प्रेमाचा अनुभव अत्यंत आनंददायी आहे, असे रुद्रेश बोरामणी यांनी व्यक्त केली.
कसबा गणपतीच्या मान्यवरांच्या सत्कार प्रसंगी अनेक भाविक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात मान्यवरांचा सन्मान करण्यात आला आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. वातावरण भक्तिमय आणि उत्साहपूर्ण होते.



