क्राईमदेश - विदेशमहाराष्ट्र

खळबळजनक ; भेटण्यास नकार दिल्याने महिलेचे अश्लील फोटो तिच्या पती आणि नातेवाईकांना पाठवले

नवी मुंबईतील खारघर येथून एक खळबळ उडवून देणारी घटना उघडकीस आली असून एका ३७ वर्षीय विवाहितेला ब्लॅकमेल करून तिच्यावर वारंवार बलात्कार केला…. महिलेने संबंध तोडण्यास सांगत भेटण्यास नकार दिल्याने तिचे अश्लील फोटो तिच्या पतीला आणि नातेवाईकांना पाठवले या प्रकाराने कुटुंबाला चांगलाचं धक्का बसला. दरम्यान सदर प्रकरणी एका तरुणाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी फरार असून खारघर पोलीस त्याचा शोध घेत आहेत.मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार, आरोपी नेरुळमधील सारसोळे गावातील रहिवासी आहे. तर, पीडित महिला खारघरमधील एका वित्तीय कंपनीत काम करते. आरोपीने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पीडितेशी मैत्री केली. त्यानंतर कामानिमित्त भेटीतून त्यांची मैत्री आणखी घट्ट झाली. यादरम्यान आरोपीने पीडिताचे अश्लील फोटो काढून तिच्यावर बलात्कार केला. आरोपीच्या शारीरिक त्रासाला वैतागून पीडिताने त्याच्याशी मैत्री संपवण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याला भेटण्यास नकार दिला. यावर संतापलेल्या आरोपीने पीडिताचे अश्लील फोटो तिच्या पती आणि नातेवाईकांना पाठवले.
यानंतर पीडित महिलेने खारघर पोलीस ठाणे गाठून आरोपीविरोधात फिर्याद दिली. या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत असल्याचे, खारघर पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel