खासदार प्रणिती शिंदेंना धक्का;खंदा समर्थक भाजपच्या संपर्कात…
काँग्रेस जिल्हा सरचिटणीस रॉकी बंगाळे पालकमंत्री जया भाऊसोबत...

सोलापूर महानगरपालिका निवडणुकी पासून नाराज असलेले काँग्रेस जिल्हा सरचिटणीस अमोल उर्फ रॉकी बंगाळे भाजपच्या वाटेवर आहेत.काँग्रेस पक्षात आंबेडकर चळवळीतील नेता म्हणून रॉकी बंगाळे अशी ओळख होती.सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत भाजपचे पालकमंत्री जय कुमार गोरेंच्या संपर्कात आलेले रॉकी बंगाळे हे आता उघडपणे पालकमंत्री जयकुमार गोरे सोबत सोलापुरात वावरताना दिसत आहेत.पंढरपूर येथे एका कार्यक्रमात रॉकी बंगाळे आणि भाजपचे नेते व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे एकाच वाहनात होते.पालकमंत्री जय कुमार गोरे आणि अमोल उर्फ रॉकी बंगाळे यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाल्याने सोलापुरातील काँग्रेस गटात खळबळ उडाली आहे. काँग्रेसच्या जोरावर सोलापुरात नावलौकिक मिळवलेले बंगाळे स्वतःला भाजपमय करून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.2019 मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत वंचितचे अध्यक्ष डॉ प्रकाश आंबेडकर यांनी सोलापुरातून निवडणूक लढवली होती.काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे , भाजपचे डॉ जय सिद्धेश्वर महाराज, अशी तिरंगी लढत झाली होती.या निवडणुकीत रॉकी बंगाळे याने स्वतः ला कट्टर सुशिल कुमार शिंदे समर्थक आहे अशी प्रतिमा निर्माण केली होती.


