सोलापूर जि.प शिक्षण मंडळाचे अधिकारी लापत्ता त्यामुळे होतो नागरिकांचा हेलपाटा
कार्यालयीन अधिकारी कामाच्या वेळेस उपस्थित न राहिल्यास अधिकाऱ्यांच्या आसनास पूजा आंदोलन करणार

सोलापूर दि.29/7/2024 महाराष्ट्र शासनाने प्राथमिक शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनींना शासनामार्फत मोफत गणवेश देण्याचा आदेश काढला परंतु या आदेशाची अंमलबजावणी झाली नाही म्हणून सोलापूर जिल्हा परिषद शिक्षण अधिकारींना भेटून विद्यार्थ्यांना गणवेश लवकरात लवकर मिळण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे. म्हणून वेळोवेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगर प्रमुख विष्णू कारमपुरी (महाराज)व इतर पदाधिकारी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागात भेटीसाठी गेले असता शिक्षणाधिकारी भेटत नाही आणि त्यांच्या देखरेखी खालील काम करणारे अधिकारी भेटत नाहीत यावरून शिक्षण मंत्रालयाचा अधिकाऱ्यांच्या वर कसलीही जरब नसल्याचे दिसून येते म्हणजे जिल्हा परिषद शिक्षण मंडळाचे अधिकारी लापत्ता नागरिकांचा होत आहे हेलपाटा असे म्हणताना कारमपुरी(महाराज)यांनी कार्यालयीन वेळेत अधिकारी आसनावर उपस्थित नसल्यास आसनाची पूजा आंदोलन करण्यात येईल असा इशारा कारमपुरी (महाराज) यांनी दिला
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महाराष्ट्र शासनाचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या तुगलकी कारभारामुळे प्राथमिक शालेय विद्यार्थ्यांना गणवेशापासून वंचित राहावे लागत आहे या विरोधात आंदोलन करण्यात आला परंतु अद्यापही गणवेशाचा पत्ता नाही याबाबत प्राथमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद, यांना सुमारे एक महिन्यापासून भेटण्याचा प्रयत्न केला परंतु प्रत्येक वेळी साहेब मिटींगला गेले, साहेब ट्रेनिंगला गेले, साहेब व्हिजिटला गेले, असे उत्तरे दिले जाते आणि कार्यालयातील इतर अधिकारी देखील भेटत नाही. कार्यालयीन कर्मचारी उडवा उडवीचे उत्तर देतात उद्धट बोलतात असाच प्रकार दि. 29/7/ 2024 रोजी विष्णू कारामपुरी (महाराज) शिवसेना महानगरप्रमुख व इतर पदाधिकारी गेले असता शिक्षणाधिकारी ट्रेनिंगला गेले,तर सहशिक्षणाधिकारी व्हिजेटला गेलेत आणि इतर अधिकारी बाहेर गेलेत असे उत्तर शिक्षण मंडळाकडून मिळाले यावरून प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालय कर्मचारी मनमानी- नागरिक मात्र फिरून फिरून झाले अनवाणी असेच म्हणावे लागेल. पण नाही,9 ऑगस्ट या “क्रांतीदिनी”शिक्षणाधिकारी कार्यालयावर तीव्र निदर्शने करण्यात येणार आहे असेही पत्रकात नमूद केले आहे



