World Cup 2023 फायनल आणि मोहम्मद शमी याच्या आईची खालावली प्रकृती, रुग्णालयात दाखल

World Cup 2023 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेट वर्ल्ड कपच्या फायनल सामान्यापूर्वी एका वाईट बातमी समोर येत आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याची आई अंजुम आरा यांची प्रकृती खालावली आहे.
क्रिकेटपटूच्या आईला उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आहे. शमी याच्या आईला काय झालं आहे… याबद्दल काहीही कळू शकलेलं नाही. सध्या शमीच्या आई सोबत त्याची बहीण आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मोहम्मद शमी याच्या आईंच्या प्रकृतीची चर्चा सुरु आहे.
मिळत असलेल्या माहितीनुसार, प्रकृती खालावण्यापूर्वी शामी याच्या आईने भारताने क्रिकेट सामना जिंकण्यासाठी प्रार्थना केली होती. शामी याच्या आई अंजुम आरा म्हणाल्या, ‘सकाळीच शमी याच्यासोबत बोलणं झाला आहे. फक्त त्याची खुशाली विचारली आणि शुभेच्छा दिल्या…’ पण आता शमीच्या आईंची प्रकृती खालावल्यामुळे चाहत्यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे.
वर्ल्ड कप भारतच जिंकेल – शामी याची आई
‘वर्ल्ड कप भारतच जिंकेल… यावर माझा विश्वास आहे. मुलं आनंदाने त्यांच्या घरी परतील अशी देवाकडे प्रार्थना करते…’ असं देखील अंजुम आरा म्हणाल्या होत्या. आज फायनल असल्यामुळे संपूर्ण देशाच्या नजरा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये रंगणाऱ्या सामन्याकडे आहे. महत्त्वाचं म्हणजे भारताने वर्ल्ड कप जिंकावा म्हणून देशातील प्रत्येक नागरिक प्रर्थना करत आहे.
सांगायचं झालं तर, आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड कप फायनल खेळला जात आहे. संपूर्ण जगाचं लक्ष फक्त आ फक्त आजच्या सामन्याकडे आहे. महत्त्वाचं म्हणजे, भारत संघाने आतापर्यंत एकही सामना हारलेला नाही. भारताने 10 सामने खेळले असून ते सर्व जिंकले आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या सेमी फायनल सामन्यात मोहम्मद शमी याने मैदानावर उत्तम कामगिरी केली. सामन्यात मोहम्मद शमी याने 7 विकेट घेत इतिहास रचला.