खुनी हल्ला प्रकरणी अटकेतील आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथून जामीन मंजूर…*
सोलापुर ( प्रतिनिधि ): सोलापुर जिल्ह्यातिल मोहोळ पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे क्रमांक ६४०/२०२३ अन्वये भा.द.वी कलम ३०७,३६३,३९४,५०४,३४ प्रमाणे आरोपींविरुद्ध दिनांक _२७/०८/२०२३_ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरणात यातील _आरोपी मल्लिकार्जुन दोडडे_ याने फिर्यादीस दिनांक _२३/०८/२०२३_ रोजी भेटण्यास बोलवले असता फिर्यादीला सायंकाळी ७:३० च्या सुमारास पैशाची मागणी केली होती तसेच फिर्यादीचा फोन पे पासवर्ड आणि फोन पे द्वारे पैसे देण्यास दम दिला होता. त्यानंतर आरोपीने फिर्यादीला हाता-लाथा भुक्क्याने मारहाण केली होती तसेच शिवीगाळ व दमदाटी ही केली होती. फिर्यादीच्या डोक्यावर आरोपीने हातातील दगडाने मारहाण केली असल्यामुळे त्याच्या डोक्यातून रक्तस्त्राव होत होते ,त्यास्वरूपी त्याला सिविल हॉस्पिटल सोलापूर येथे उपचार करिता नेण्यात आले होते. आरोपीने आपला जामीन अर्ज जिल्हा सत्र व न्यायालय सोलापूर येथे दाखल केला होता. जिल्हा व सत्र न्यायाधीश _योगेश राणे_ यांनी आरोपीचा जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात आरोपी तर्फे _ॲड. कदीर औटी,ॲड. दत्तात्रय कापुरे,ॲड. इमरान पाटील व ॲड. सोहेल रामपुरे_ यांनी काम पाहिले.