जादूटोणा करून पोलीस अधिकाऱ्याची 33 लाख रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी मुस्लिम मांत्रिक यास जामीन मंजूर :- अॅड. रियाज एन शेख
सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयांमधून सेवानिवृत्त झालेले सहाय्यक फौजदार उद्धव विठ्ठल घोडके वय:-61 वर्ष, राहणार- दमानी नगर, सोलापूर यांना कोर्टातील प्रकरण आपसात मिटवून निकाल करून देण्याचे आमिष दाखवून त्यांना पंढरपूर येथील मुस्लिम मांत्रिक नामे तौसीफ अहमद तुराबखान मसरगुपी यांनी फिर्यादीस घरामध्ये बसवून डोळे झाकण्यास सांगून मोरपंख च्या झाडूने डोक्यात मारून मंत्र म्हणून जादूटोणा केला व त्यानंतर वेळोवेळी इतर आरोपींची संगणमत करून फिर्यादीचे एकूण रक्कम रुपये 33 लाख 75 हजार रुपयाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी व दमदाटी केल्याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे दिनांक 24 ऑक्टोबर 2024 रोजी भा.द.वि कलम 420 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
सदर दाखल गुन्ह्यामध्ये मुस्लिम मांत्रिक नामे तौसीफ अहमद तुराबखान मसरगुपी यास फौजदार चावडी पोलिसांन देनांक 25 ऑक्टोबर 2024 रोजी अटक करून सोलापूर येथील न्यायालयामध्ये हजर केले होते. सदर मांत्रिकास मेहरबान न्यायालयाने सुमारे २ दिवस पोलीस कोठडी सुनावली होती व त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी मध्ये ठेवण्याचे आदेश पारित केले होते. सदर मुस्लिम मांत्रिक यांच्या वतीने अँड. रियाज एन शेख यांनी सोलापूर येथील सत्र न्यायालयांमध्ये जामीन अर्ज सादर केलेला होता. सदर जामीन अर्जामध्ये आरोपी मुस्लिम मांत्रिक यांच्या वतीने युक्तिवाद करत असताना अँड. रियाज एन शेख यांनी घटना घटनेची सुरुवात 2015-2016 सालीपासून झाली असून त्यावेळी फिर्यादी हे पोलीस अधिकारी म्हणून कर्तव्यावर हजर होते. फिर्यादी यांना मांत्रिक यांनी दिनांक 19 फेब्रुवारी 2018 रोजी जादूटोणा केल्याचे जरी गृहीत धरले तरी त्यानंतर सुमारे 2024 पर्यंत पोलीस अधिकाऱ्याने अनेक वेळा इतर आरोपींना लाखो रुपयांनी पैसे दिलेले आहेत. त्यामुळे केवळ एकच दिवस जादूटोणा केल्यामुळे सदरची घटना घडली ही अशक्यप्राय गोष्ट आहे. एकंदरीत फिर्यादीचा व इतर आरोपींचा शेतजमिनी संदर्भात दिवाणी वाद असून सदर दिवाणी प्रकरणाला फौजदारी वळण देऊन पोलीस अधिकारी असल्याचा गैरफायदा घेऊन खोटा गुन्हा दाखल केल्याचे तसेच तपासामध्ये मुस्लिम मांत्रिक यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे संशयास्पद वस्तू जप्त झालेल्या नाहीत त्यामुळे जादूटोणा अधिनियमाचे कलमे सुद्धा लागू झालेली नाहीत. केवळ रक्कम वसूल करण्याकरिता खोटी फिर्याद सुमारे 6 वर्षानंतर दाखल केल्याचे मेहरबान न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून सोलापूर येथील सत्र न्यायाधीश जे.जे. मोहिते साहेब यांनी आरोपी मांत्रिक यास रक्कम रुपये 50 हजाराच्या जातमुचलक्यावर जामीन तसेच दर रविवारी पोलीस स्टेशनला हजेरी देण्याच्या व साक्षीदारावर दबाव न आणण्याच्या अटीवर सशर्त जामीन मंजूर केला.
सदर प्रकरणांमध्ये आरोपी अर्जदार मुस्लिम मांत्रिक तर्फे अॅड. रियाज एन शेख यांनी काम पाहिले तर सरकार पक्षा तर्फे श्रीमती बागल यांनी काम पाहिले