सोलापूर बातमीमहाराष्ट्रसोलापूर सामाजिक

जिजाऊ सोहळ्यात सहभागी होण्यासाठी सोलापुरातून 40 जोडपी सिंदखेड राजाला रवाना…

छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करून झाले मार्गस्थ....

प्रति वर्ष प्रमाणे मराठा सेवा संघाच्या वतीने सिंदखेडराजा येथे आंतरराष्ट्रीय स्तरावर जिजाऊ जन्मोत्सवाचे आयोजन केले जाते. या जिजाऊ सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी सोलापूर शहरातून 40 जोडपी शनिवारी दोन विशेष गाड्या करून सिंदखेड राजाला रवाना झाले आहेत.
दरवर्षी मराठा सेवा संघातर्फे सिंदखेडराजा येथे आंतरराष्टीय स्थळावर जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन केले जाते.या जन्मोत्सव सोहळ्यामध्ये महाराष्ट्रासह देशभरातील जगभरातील जिजाऊ भक्त व शिवप्रेमी लाखोच्या संख्येने सहभागी होत असतात. गेली दोन वर्ष कोरोना महामारीच्या विळख्यात सापडला होता. त्यामुळे हा जन्मोत्सव मर्यादित स्वरूपात साजरा केला जात होता.
मात्र यंदाचा जिजाऊ जन्मोत्सव सोहळा भव्य आणि दिव्य स्वरूपात साजरा करण्याचा निर्णय मराठा सेवा संघाच्या वतीने घेण्यात आला. मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर त्यांच्या आदेशानुसार सर्व मराठा सेवा संघाच्या शाखांच्या बैठकांचे नियोजन करून जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यासाठी पती-पत्नी अशा जोडीने सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार मराठा सेवा संघाच्या प्रत्येक आपल्या शहरातून महिलांचा सहभाग वाढावा म्हाणून नियोजन केले. पुणे विभागीय अध्यक्ष प्रशांत पाटील, जिल्हाध्यक्ष डॉ. जी. के देशमुख आणि सोलापूर शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी नियोजन करून दोन विशेष बस मधून 40 जोडपी जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यात सहभागी होण्यासाठी शनिवारी रवाना झाले. छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन करून जय जिजाऊचा नारादेत जिजाऊ भक्त सहभागी झाले
कोषाध्यक्ष आर पी पाटील,लक्ष्मण महाडिक,सदाशिव पवार, प्रकाश ननवरे यात्रेची नियोजनाची जबाबदारी पूर्ण केली.
चौकट
जिजाऊचा जन्म जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे 12 जानेवारी 1598 रोजी झाला. हे जिजाऊंचे जन्मस्थळ मराठा सेवा संघाच्या माध्यमातून ऐतिहासिक स्थळ म्हणून पुढे आणले जात आहे. मराठा सेवा संघाच्या माध्यमातून जिजाऊ जन्मसृष्टीची निर्मिती सिंदखेड राजा येथे केली जात आहे.या मागची भूमिका आहे त्यामुळे प्रतिवर्षी जिजाऊ महासाहेबांचा जन्मदिन आणि लाखोंच्या उपस्थितीमध्ये साजरा केला जातो.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

betkom giris

Proda Login