सोलापूर बातमीमहाराष्ट्रसोलापूर निधन वार्तासोलापूर सामाजिक

ज्येष्ठ कवी, गीतकार माधव पवार यांचे दीर्घ आजाराने निधन…

१६५० डायलिसिसचा टप्पा पूर्ण करणारा झुंजार साहित्यिक हरपला...

सोलापूरचे ज्येष्ठ कवी आणि गीतकार माधव रामचंद्र पवार (वय ७१) यांचे बुधवारी, ६ मे २०२६ रोजी पहाटे ४ वाजता त्यांच्या राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या १२-१३ वर्षांपासून ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते. या अत्यंत कठीण काळात त्यांनी तब्बल १ हजार ६५० डायलिसिसचा टप्पा पूर्ण करून जीवनाशी झुंज दिली होती. त्यांच्या निधनाने सोलापूरच्या सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सायंकाळी मोदी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
​ माधव पवार यांनी सोलापूरच्या डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात वरिष्ठ लिपिक म्हणून ३५ वर्षे सेवा बजावली. आपल्या कार्यकाळात त्यांनी भांडारपाल, कोषागार, ओपीडी, स्त्री व प्रसुती शास्त्र आणि ॲनाटोमी अशा विविध विभागांमध्ये कार्यक्षमतेने काम पाहिले होते. ते ज्येष्ठ कवी आणि गीतकार रा. ना. पवार यांचे चिरंजीव होत.
साहित्याची ओढ असलेल्या माधव पवार यांचे ‘हे शुभशकुनांचे पक्षी’ आणि ‘गरूडभरारी’ हे दोन काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. त्यांच्या काव्यप्रतिभेची दखल घेत महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्यासह राज्यस्तरावरील २१ मानाच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते. सोलापुरात संपन्न झालेल्या ७९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ‘स्वागत गीत’ लिहिण्याचा बहुमान त्यांना मिळाला होता. अनेक विभागीय आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनांमधील कवी संमेलने त्यांनी आपल्या कवितांनी गाजवली होती.
​ कवी माधव पवार यांनी लिहिलेली गीते महाराष्ट्रातील नामवंत गायकांनी गायली आहेत. त्यांच्या गीतांच्या अनेक ऑडिओ कॅसेट आणि सीडी प्रकाशित झाल्या आहेत. सुरेश वाडकर, स्वप्निल बांदोडकर, प्रल्हाद शिंदे, आनंद शिंदे, आदर्श शिंदे, शकुंतला जाधव, जगदीश गोरसे, सुरेखा पुणेकर, बेला सुलाखे यांसारख्या दिग्गज गायकांनी त्यांच्या शब्दांना स्वरसाज चढवला आहे.
​ त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनानंतर सोलापूरच्या साहित्य, कला आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
​ही गरुडभरारी माझी
कोणी रोखू नका हो आता
मी वीज होऊनही जाईन
दुनियेतून जाता जाता…
​या स्वतःच्याच ओळींप्रमाणे एका महाकवीने आज अनंतात भरारी घेतली आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia