खेळमहाराष्ट्रसोलापूर बातमी
जिशान मेलीनमनी याची शालेय राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड…
जिल्हा अधिकारी क्रीडा कार्यालय नांदेड यांच्यामार्फत राज्यस्तरीय हॉकी निवड चाचणी घेण्यात आली. या निवड चाचणीतून अक्कलकोट येथील इंडियन मॉडेल स्कूलच्या जिशान मेलीनमनी याची १७ वर्षांखालील मुलांच्या वयोगटातून रोहतक हरियाणा येथे होणाऱ्या शालेय राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.
या खेळाडूला राज्य क्रीडा मार्गदर्शक जरार कुरेशी, क्रीडाशिक्षक दयानंद दणुरे, सहशिक्षक संतोप सोनकंटले, हॉकी प्रशिक्षक अवेज होटगी यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल शाळेचे संस्थापक अध्यक्ष सिध्दाराम म्हेत्रे, उपाध्यक्ष अमोल जोशी, संस्थेचे सचिव शीतल म्हेत्रे, सायली जोशी, वी.एड. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणपती वाघमोडे, शाळेच्या मुख्याध्यापिका गौरी दातार यांनी या यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले….