क्राईम

लालू प्रसाद यादव यांच्या मुलासह मुलींच्या अडचणीत वाढ

बिहार, दिल्लीत ई.डी.चे छापे.....

नवी दिल्ली : बिहारमधील राजदच्या अडचणी कमी होण्याचे काही नाव घेत नाहीत.
कारण जमीन घोटाळ्याप्रकरणी ई.डी.ने लालू प्रसाद यादव यांच्या दिल्लीतील मुलींचे निवासस्थान, बिहारमधील आर.जे.डी.च्या माजी आमदारांच्या १५ ठिकाणांवर आणि गुरुग्राममधील एका खासगी बिल्डरच्या कार्यालयावर छापे टाकल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, या अगोदर पाटणा येथील सी.बी.आय. पथकाने जमिनीच्या बदल्यात नोकरी देण्याच्या प्रकरणी माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांची चौकशी केली होती.
त्याचवेळी दिल्लीत आर.जे.डी. सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांचीही चौकशी करण्यात आली. याप्रकरणी ई.डी.ची टीम कारवाईत आहे.

पाटण्यातील न्यू फ्रेंड्स कॉलनी भागातील उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या घरी ई.डी.चे पथक पोहोचले आहे.
त्याचवेळी ई.डी.ने आर.जे.डी.चे माजी आमदार अबू दोजाना यांच्या ठिकाणांवर छापे टाकले आहेत.
लालूप्रसाद यादव यांच्या दिल्लीतील मुली आणि गुरुग्राममधील एका बिल्डरच्या कार्यालयावर छापेमारी सुरू आहे.

ई.डी.च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,
जॉब फॉर जॉब घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी आमदार अबू दोजाना यांच्या 15 ठिकाणांवर छापे टाकण्यात येत आहेत.
एवढेच नाही तर फुलवारी शरीफ येथील अबू दोजानाच्या निवासस्थानावरही छापे टाकण्यात येत आहेत.
या प्रकरणात लालू प्रसाद यादव आणि त्यांचे कुटुंबीयही आरोपी आहेत.
लालू प्रसाद यादव यांच्या मुलींच्या दिल्लीतील निवासस्थानावरही छापे टाकण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे.
ई.डी.चे पथक गुरुग्राममधील एका खासगी बिल्डरच्या कार्यालयातही पोहोचले आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia