डोक्यात लोखंडी रॉड घालून जीवे ठार मारण्याच्या प्रयत्न केलेल्या आणखी एका आरोपीची अटकपूर्व अंतरिम जामीनावर मुक्तता..!

तरी यात एफ.आय.आर.मधील हकीकत अशी की दि 07/03/2025 रोजी सकाळी 10.30 वाचे सुमारास फिर्यादी गावातील जुन्या पाण्याच्या टाकी जवळ उभा असताना आरोपींनी मिळून फिर्यादी ला शिवीगाळ करुन लाथाबुक्याने मारहाण करून एका आरोपीने फिर्यादी चे गुप्तांग पिरगाळून गंभीर जखमी केले जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला, सर्व आरोपी रा गुंजेगाव ता द सोलापुर यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्याने मारहाण करुन दुसऱ्या आरोपीने फिर्यादी ला लोखंडी रॉडने डोक्यात वार करुन गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचे प्रयत्न केला तसेच इतर आरोपींनी फिर्यादी ला जिवे ठार मारण्याची चितावणी दिली म्हणून फिर्यादीने सर्व आरोपींविरुद्ध मंद्रूप पोलीस स्टेशनमध्ये बी एन एस 109,115(2),126(2),189(3),190,191(2),351(2),351(3),352,49 लोकांनविरुध्द तक्रार दाखल केली होती.
यात सविता मोहन भडकुंबे यांनी ॲड अखिल शाक्य यांच्यामार्फत मे जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केलेला होता. सदर जामिनामध्ये आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून मी जिल्हा व सत्र न्यायाधीश योगेश राणे साहेब यांनी वरील आरोपींचा प्रत्येकी 50000 रुपयाच्या अटकपूर्व अंतरिम जामीनावर मुक्तता करण्याचा आदेश केला.
यात वरील आरोपीतर्फे ॲड अखिल शाक्य,ॲड हर्षल शाक्य, ॲड दर्शना चक्रवर्ती, ॲड अश्विनी कांबळे यांनी काम पाहिले